Bay -team aavaj marathi
पवित्र श्रावण महिन्यात शिव मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी असणारे नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामदैवत व मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि खानदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षैत्र पिनाकेश्वर महादेवास सालाबाद प्रमाणे यंदाही सोमवार दि.१५ ऑगस्ट पासून सलग तीन दिवस सुट्ट्या आणि आणि यंदा श्रावण महिन्यातील शेवटचा चौथा सोमवार असल्याने ज्यांना गर्दीमुळे आगोदर येता आले नाही, त्या भाविकांनी मिळेल त्या वाहनाने येवून सायंकाळी उशिरापर्यंत दर्शन घेतले. चार दिवसात चार लाखांपेक्षा अधिक भाविक पिनाकेश्वर चरणी लीन झाले असल्याचा दावा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला.
रविवारी सायंकाळी ट्रॅक्टरच्या दुर्घटनेनंतर सोमवारी सकाळी सात वाजेपासून पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आलें होतें. सोमवारी दिवसभर सर्वंच वाहनांना घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथे आलेल्या भाविक तसेच पर्यटकांनी आपापले वाहने डोंगर पायथ्याशी उभे करुन पडत्या पावसात देव दर्शनासह पर्यटनाचा आनंद घेतला.
श्रावण महिना सुरू झाल्यापासून ठिकठिकाणच्या सुमारे पन्नास पेक्षा अधिक शेकडो भाविकांच्या दिंड्या येथे आल्या त्यांच्या मुक्काम व्यवस्था मंदिर परीसरातील शेडमध्ये करण्यात आली होती. येणार्या भाविकांना विश्रांती करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती.तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ मंदिर परिसरात करण्यात आले होते. सोमवार वगळता इतर दिवशी त्याचा उपयोग झाला. मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर प्रसाद खेळणी इमिटेशन ज्वेलरी फोटो मिठाई दुकाने ठेवण्यात आली असल्याने येणार्या भाविकांना थांबण्यासाठी बर्या पैकी जागा उपलब्ध झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष बहाकर व सुनील बढे पोलिस हवालदार भास्कर बस्ते, भरत कांदळकर पोलिस शिपाई परमेश्वर श्रीखंडे तसेच महिला व पुरुष पोलिस कर्मचारी होमगार्ड ऋषिकेश पठाडे गणेश इप्पर इत्यादींनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
0 Comments