Bay- team aavaj marathi
किरण काळे पत्रकार नांदगाव (नाशिक)
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्ताने संस्थेत १९ ऑगस्ट समाजदिन म्हणून साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्रांगणात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल , औद्योगिक प्रशिक्षण केंद्र,आदर्श प्राथमिक शाळा,होरायझन अकॅडमी, बाह्य रुग्ण सेवा कक्ष या सर्व शाखेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या समाज ध्वजाचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक अमितभाऊ बोरसे-पाटील यांनी केले.
यानंतर समाजदिन निमित्ताने रेखाटलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा.दिलीप शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. होरायझन अकॅडमी चे कलाशिक्षक सौरभ शेवरे यांनी कर्मवीर रावसाहेब थोरात व संस्थेचे बोधचिन्ह तर न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी ओम सुपेकर याने कर्मवीर डी. आर. भोसले व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी प्रतिकृती सुंदर रेखाटली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून असून इंजि.अमितभाऊ पाटील यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे, संस्थेचे विकास हेच माझे प्रामाणिक ध्येय असेल हे सांगितले. त्यांनी सर्व उपस्थित त्यांना समाज दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार श्री संजू भाऊ निकम, श्री सुरेश आप्पा शेळके, श्री संदीप जेजुरकर ,श्री महेंद्र पगार, श्री किरण काळे ,श्री विजय बडोदे, श्री नाना अहिरे,श्री महेश पेवाल, श्री अनिल आव्हाड श्री सुरेश नारायणे सर उपस्थित होते
प्रमुख वक्ते प्रा.दिलीप शिंदे यांनी आपल्या मनोगतातून सर्व कर्मवीरांनी संस्थेसाठी केलेल्या कार्याची परिचय करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भिला पवार, दत्तात्रय भिलोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संजय मराठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संकुलातील शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाची सांगता संगीत शिक्षिका कल्पना अहिरे यांनी पसायदानाने केली.
0 Comments