नांदगाव महाविद्यालयात करिअर कट्ट्याचे उद्घाटन

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार मांडवड नांदगाव (नाशिक)

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट रोजी करिअर कट्टा उपक्रमाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भुषविले व आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या वाटा व संधीची जाणिव करून दिली. 

 
त्याच प्रमाणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे, सिनेट मेंबर व भूगोल विभाग प्रमुख डॉ. सी. बी. निगळे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक प्रा. एम. बी. अटोळे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. के. आर. खंदारे आणि स्पर्धा परीक्षा प्रमुख प्रा. आर. व्ही. वाघ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील करिअर कट्ट्याचे समन्वयक प्रा़.आर.टी.बिन्नर यांनी विद्यार्थ्यांना सदर उपक्रमावर सविस्तर मार्गदर्शन केले

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. ए. एम. लव्हाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका एस. एम. आवारे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments