दुसर्या श्रावणी सोमवारी पिनाकेश्वराचे सुमारे दिड लाख भाविक नतमस्तक

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराच्या शिखरावर नाशिक, जळगाव आणि छत्रपती संभाजी नगर या तीन जिल्ह्याच्या वन विभागाच्या हद्दीवर आणि नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे जातेगांव येथील सर्वात श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी रविवारी रात्री रात्री १२ वाजेपासून पवित्र श्रावणी सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे दिड लाख भाविक नतमस्तक झाले असल्याचा अंदाज देवस्थान ट्रस्टच्या वतीने वर्तविण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की,जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्रंबकेश्वर या बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या महादेवाच्या मंदिरानंतर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महादेवाचे देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री पिनाकेश्वर महादेवाचे देवस्थान आहे. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांनी हर हर महादेव, सद्गुगुरू जनार्दन स्वामी महाराज की जय, गंगागिरीजी महाराज की जय, बंब बंब भोले च्या गजरात दर्शन घेतले. आलेल्या बहूतांश भाविकांनी सत्यनारायण महापूजा अभिषेक इत्यादी धार्मिक विधी करून देवास डाळबट्टीचा नैवेद्य अर्पण केला.

या पिनाकेश्वर महादेवाच्या मंदिराचा हेमाडपंथी बांधणीचे सन १९६० च्या दशकात संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी पंचक्रोशीतील नागरिकांच्या सहकार्याने जीर्णोद्धार करून मंदिराच्या आतील सर्व देवी देवतांच्या मूर्ती श्रीक्षेत्र काशी येथून आणून प्राणप्रतिष्ठा केली होती. त्यानंतर ब्रह्मचारी गंगानंद महाराज यांनी मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम त्याच प्रमाणे गोशाळा, भक्त निवास इत्यादी काम पूर्ण केले होते. 

 रविवारी रात्री १२ वाजता श्री पिनाकेश्वरास विश्वस्त मंडळाच्या वतीने महाभिषेक करण्यात आला, त्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. रात्री १२ वाजेपासून ते सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत वाजेपर्यंत मिळेल त्या वाहनाने येवून दिड लाखापेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले. 

छत्रपती संभाजी नगर येथील खासगी सुरक्षा रक्षक आणि पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, सुनील बढे आणि गावित यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार भास्कर बस्ते,भरत कांदळकर, परमेश्वर श्रीखंडे पुरुष व महिला पोलिस शिपाई दंगा रोधक पथक आणि होमगार्ड पथक यांनी चोख बंदोबस्त बजाविल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.




Post a Comment

0 Comments