के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक आणि मुक्तांगण निफाड तालुका मध्यवर्ती सार्वजनिक वाचनालय, यांच्या संयुक्त विद्यमाने "गुरु शिष्य स्मृतिमाह स्पर्धा २०२५ वर्ष ४२ वे" उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दिनांक -३१ जुलै रोजी करण्यात आले होते. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्यांस वाव देणारे एक उत्तम व्यासपीठ ठरली. ज्यामध्ये यात नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. यात नांदगाव कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री मणी चावला, पर्यवेक्षक रिटा उबाळे,इंग्रजी विषय शिक्षक नाईकवाडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वक्तृत्व सादर करून दोन गटांमधून तीन गौरवप्राप्त पारितोषिके मिळवली!
गट १ : इयत्ता ५ वी ते ७ वी. प्रथम क्रमांकाने कु. व्रिंदा जितेंद्र पटेल (इयत्ता ७वी)द्वितीय क्रमांकाने कु. प्रविषा कुणाल कासलीवाल (इयत्ता ५वी.), व : इयत्ता ८ वी ते १० वी.कु. मोक्षा निलेश पारख (इयत्ता ८ वी) प्रथम क्रमांक पटकावल्याने ट्रॉफी + रोख रक्कम तसेच रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केल्याने शाळेचा गौरव आणि अभिमान वाढवला आहे!
या सर्व बाल गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुशिलकुमार जी कासलीवाल तसेच संस्थेचे सचिव विजय चोपडा,सहसचिव सौ.प्रमिलाताई कासलीवाल, सुशिल भाऊ कासलीवाल, जुगलकिशोर जी अग्रवाल, महेंद्र चांदीवाल ,रिखबचंद कासलीवाल, प्रकाश गुप्ता आणि स्कूल चे प्राचार्य मणी चावला, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व त्याचे मन:पूर्वक अभिनंदन केले!
0 Comments