Bay- team aavaj marathi
Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)
उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय च्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागातील भक्ती देशमुख, स्वाती शिंदे व श्रुती शर्मा ह्या तीन गुणवंत विद्यार्थिनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या नुकत्याच जाहीर झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकल्या आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे गुणवत्ता यादीमध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थी झळकण्याची महाविद्यालयाची नेत्रदीपक यशाची परंपरा यावर्षीही कायम राहिली आहे.

Bhakti Ashish Deshmukh CGPA 9.06- 2 nd merit
यंदा तीनही मुलीच मेरिट आल्या असून यापूर्वीही रसायनशास्त्र विभागातील तीन विद्यार्थी एकाचवेळी गुणवत्ता यादीत चमकले होते. आतापर्यंत रसायनशास्त्र विभागातील सुमारे पंधरा विद्यार्थी मेरिट आले आहेत, हे सुद्धा उल्लेखनीय म्हणावे लागेल. यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर यांनी लक्ष देऊन सातत्याने गावंडे महाविद्यालयाची विकासात्मक वाटचाल होण्यासाठी अनेक उपक्रम राबविले.
Swati Ramesh Shinde
CGPA 8.74- 7 th merit
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या रोजगार कक्षाच्या माध्यमातून मेळावा आयोजित करीत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली. अनेक विद्यार्थी नामांकित कंपनीत आणि विविध स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत नोकरीसाठी रुजू झाले. महाविद्यालयास मागील वर्षी नॅक संस्था, बंगलोर यांच्याकडून मूल्यांकन झाल्यानंतर 'अ' श्रेणी मिळाली आहे.Shruti Sushil Sharma
CGPA 8.55 -9 th merit
भक्ती आशिष देशमुख ही दुसरी मेरिट, स्वाती रमेश शिंदे ही सातवी मेरिट व श्रुती सुशील शर्मा ही नववी मेरिट आली आहे. ह्या तीन विद्यार्थिनींनी अमरावती विद्यापीठाच्या एम.एस्सी. रसायनशास्त्राच्या अंतिम वर्षाच्या उन्हाळी परीक्षेत मोठे यश संपादन करून महाविद्यालयाच्या नाव लौकिकात भर घातली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे जून २०२५ च्या सेट परीक्षेत महाविद्यालयाचे चार विद्यार्थी प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली राज्यस्तरीय पात्रता चाचणी, सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, संस्थेचे सचिव डॉ. यादवराव राऊत, सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शंकर वाघमारे, प्रा. डॉ. सुरेश राठोड, प्रा.डॉ. त्रिरत्न भगत, प्रा. अर्चना मिटके व इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या तीनही विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन केले आहे.


0 Comments