तलवार बाळगणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात क्राईमब्रँच ची कारवाई

 Bay- team aavaj marathi 

Dr . शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

 उमरखेड येथील कुटीर रुग्णालय जवळून काळ्या रंगाच्या बुलेट मोटारसायकल वर दोन इसम पुसद रस्त्याने जात असून त्यापैकी एका व्यक्तीच्या जर्किन च्या आत तलवार लपवून ठेवलेली आहे, अशी गुप्त माहिती उमरखेड पोलिसांना मिळाली त्यानुसार खात्री झाल्याने त्याचा पाठलाग करुन तलवार बाळगणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी दि. २८ रोजी करण्यात आली.

२८ डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना पोलिस नायक संतोष राठोड यांना गोपनीय माहीती च्या आधारे एका काळ्या रंगाच्या बुलेटवर दोन इसम असुन त्यापैकी जार्किन घातलेल्या एका व्यक्तीच्या  जर्किन च्या आतुन तलवार ठेवलेली असून त्या व्यक्ती पुसद रोड ने जात आहे, अशी खात्री लायक  माहिती मिळाल्याने  पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली डी. बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे यांनी संतोष राठोड, संघशिल टेंभरे, किरण राठोड यांना सोबत घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती, पुसद रोड वर गेल्यावर एक बुलेट कुटीर रुग्णालय, उमरखेड कडे जातांना दिसली. सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले असता, रितेश भारत गवळे, वय- २१ वर्ष, रा. चिंचोली संगम याच्या जर्किन च्या आतून एक लाल रंगाची मॅन असलेली स्टिलची तलवार आढळून आली तर सोबत एक काळ्या रंगाची बुलेट मिळुन आली. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या  अभिजित बाळासाहेब कनवाळे, वय- २२ वर्ष, कळमुळा यालाही अवैधरित्या व विनापरवाना शस्त्र मिळुन आल्याने ताब्यात घेण्यात आले. 

ही कारवाई पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर अधिक्षक अशोक थोरात, उप विभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड,पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली, डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, संतोष राठोड, संघशिल टेंभरे, किरण राठोड, राजु मेटकर यांनी यशस्वीरीत्या पार पडली आहे.आरोपी विरुध्द शस्त्र अधिनीयम १९५९ कलम ४२.५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments