Bay- team aavaj marathi
Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि अभ्यासाचा ताण कमी होऊन त्यांना शाळेची ओढ लागावी, या उद्देशाने डॉ. इक्बाल नगर परिषद उर्दू गर्ल्स मिडल स्कूल, उमरखेड येथे ‘आनंदी शनिवार’ उपक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले होते. केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक राहत रोशन अंसारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
बौद्धिक आणि शारीरिक कसरतीचे खेळ कार्यक्रमाच्या सुरुवातीला जुबेर अहमद खान नजीर मोहम्मद खान यांनी विद्यार्थिनींसाठी विविध बौद्धिक चाचणी सत्रे घेतली. त्यानंतर शालेय मैदानात विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि सांघिक भावना निर्माण होण्यास मदत झाली.
शैक्षणिक व भाषिक उपक्रम शिरीन नाज हैदर अकील खान यांनी अत्यंत सोप्या आणि रंजक रित्या विद्यार्थिनींना उर्दू व्याकरणाचा सराव करून दिला.साइयमा बतुल मन्सुरुद्दीन नवाब यांनी भाषा विषयक खेळांच्या माध्यमातून शब्दसंपत्ती आणि शुद्ध उच्चार यावर लक्ष केंद्रित केले. नफिसा बेगम शेख अकील यांनी 'नैतिकता' या विषयावर विशेष सत्र घेऊन विद्यार्थिनींना सामाजिक शिष्टाचार आणि मानवी मूल्यांची ओळख करून दिली.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे,
आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासन अधिकारी, शिक्षण विभागाचे नितीन चव्हाण, श्री विजय बेतेवाड गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती उमरखेड व श्रीमती चंदा ढोणे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांनी शाळेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा यासमीन बानो मोहम्मद खुश्तर, उपाध्यक्ष मोहम्मद इरशाद अब्दुल सत्तार आणि समितीच्या सर्व सदस्यांनी मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना दाद दिली. शैक्षणिक वातावरण अधिक आकर्षक बनवण्यासाठी असे प्रयत्न सुरू राहावेत, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचा नियोजन शेख उस्मान शेख अहमद आणि जुनैद अयाज, अहमद अजहर मुख्तार अहमद केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवाब खान अमानुल्ला खान, शमीम बानो समीर अहमद, शाइस्ता बेगम, इक्रमउल्ला खान, बुशरा जरिन, अर्शिया नाज, काशिफ अहमद, फरहाना बेगम, अर्सलानउद्दीन फारुकी यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी नवाब खान अमानुल्ला खान यांनी आभार प्रदर्शन केले. या उपक्रमाच्या यशाने डॉ. इक्बाल उर्दू प्राथमिक शाळा विद्यार्थिनींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.



0 Comments