राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

 Bay- team aavaj marathi 

हिंगोली येथे पार पडलेल्या ८ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धा २०२५ मध्ये स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मिडीयम स्कूल, दहागाव येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या नाव लौकिकात भर घातली आहे. या स्पर्धेत ईश्वरी अविनाश जाधव हिने ११ वर्ष वयोगटात कराटे फाईट प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत विशेष प्राविण्यासह सुवर्ण पदक मिळवले. तिच्या आत्मविश्वासपूर्ण खेळाने उपस्थितांची मने जिंकली.

तसेच श्रीनय शशिकांत आकरे याने १० वर्ष वयोगटात कराटे फाईट प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत विशेष प्राविण्यासह सुवर्ण पदक प्राप्त केले. त्याच्या तांत्रिक कौशल्यामुळे त्याने सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. याच स्पर्धेत गायत्री शशिकांत आकरे हिने केवळ ८ वर्ष वयोगटात कराटे फाईट प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत विशेष प्राविण्यासह सुवर्ण पदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. लहान वयात मिळवलेले हे यश प्रेरणादायी ठरले आहे.

 या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष दर्शन अग्रवाल, उपाध्यक्ष नारायण वड्डे, सचिव नितीन भुतडा, सपना अग्रवाल, संस्थेचे व्यवस्थापक आशिष लासीनकर, मुख्याध्यापक एम. पी. कदम व मुख्याध्यापिका पल्लवी पराते यांनी विजयी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि शिस्तबद्ध सरावाचे विशेष उल्लेख करत त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेच्या क्रीडा परंपरेला नवी दिशा मिळाली असून भविष्यात हे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments