Bay- team aavaj marathi
Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)
उमरखेड येथील गोपिकाबाई गावंडे महाविद्यालयात २ जानेवारी रोजी 'रोजगार कक्षा'च्या पुढाकाराने 'भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात एकूण ६५० विद्यार्थ्यांनी नोकरीची संधी मिळण्याकरिता नोंदणी केली असता. रोजगार मेळाव्यात बिस्मी टेक्नॉलॉजी नागपूर, टाटा मोटर्स पुणे, आणि सनद गुजरात, बजाज ऑटो प्रायव्हेट लिमिटेड, पुणे व छत्रपती संभाजीनगर, फियाट मोटर्स रांजणगाव.
व्हर्लपूल प्रायव्हेट लिमिटेड, रांजणगाव, टाटा बॅटरीज बंगलोर, सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स पुणे, एम्फिनॉल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, भोसरी, पुणे, एन्झिन बायो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड वाघोली, दिनशॉज प्रायव्हेट लिमिटेड, सिएट आदी कंपन्यांनी बेरोजगार युवकांच्या घेतल्या मुलाखती घेतल्या.
त्यात थेट मुलाखती नंतर २०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये गावंडे महाविद्यालयाच्या १२८ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. सर्व इच्छुक उमेदवारांना नियुक्तीची पत्रे देऊन नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, संस्थेचे सचिव डॉ. यादवराव राऊत यांच्या मार्गदर्शनात महा - विद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या सहकार्याने रोजगार कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. पी. डी. शिरभाते व प्रा. आय. वाय. खान यांच्यासह गावंडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले होते
अमरावती विभागात उमरखेड शहर बालवाडी ते नौकरी चे केंद्र बनविण्याचा प्रयत्न - राम देवसरकर
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे या आधीच सांगितले होते त्यानुसार विद्यार्थ्याचे शिक्षण ,क्रीडा ,कौशल्य विकास या विषयावर आमचा सदैव प्रयत्न असतोच त्या सोबतच रोजगार उपलब्ध देखील करून देत आहोत नर्सरी पासून शिक्षण सुरू असून नौकरी पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांना नेण्याचा मानस आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल याचा सार्थ अभिमान आहे.



0 Comments