कासलीवाल विद्यालयाची चित्रकला परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम

 Bay- team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील श्री. माणिकचंद जगन्नाथ कासलीवाल एज्यू. संस्थेच्या सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालयाचा शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा १००% निकाल लागला असून दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. दोन्ही परीक्षेसाठी एकूण 51 विद्यार्थी बसले होते.सर्व 51 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले.या विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक अनिकेत राऊत यांनी मार्गदर्शन केले.

संस्थेचे चेअरमन मा. सुशीलकुमार जी कासलीवाल, तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा,प्रशासक प्रकाश गुप्ता,सहसचिव प्रमिला ताई कासलीवाल, विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल, प्रिन्सिपॉल मनी चावला विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ, विशाल सावंत, यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments