या उर्दू शाळेचा एलिमेंटरी रेखाकला परीक्षेत १००% निकाल

Bay- team aavaj marathi 

Dr.शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

उमरखेड येथील डॉ. इक्बाल नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक कन्या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात आपली मोहोर उमटवत एलिमेंटरी रेखाकला परीक्षा २०२५ मध्ये यश संपादन केले आहे. मुख्याध्यापक राहत रोशन अंसारी यांच्या नेतृत्वाखाली शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून, परीक्षेस बसलेले १३ पैकी १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांच्या या यशात कला शिक्षक शेख मस्तान अब्दुल गणी यांचे विशेष परिश्रम व मार्गदर्शन लाभले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि शिक्षक यांच्या सामूहिक सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे मुख्याध्यापकांनी नमूद केले.  या यशाबद्दल मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, प्रशासन अधिकारी नितीन चव्हाण, उमरखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. विजय बेतेवाड आणि शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती चंदा ढोणे यांनी शाळेचे अभिनंदन केले.

A' श्रेणी. मध्ये अनाबिया फातेमा इकरामउल्ला खान, तस्मिया फातेमा नजीबोद्दीन खतीब. तर 'B' श्रेणी मध्ये गौसिया शेख अस्लम, मसिरा फातेमा फतेहयाब खान, सिदरा अनम अमीर खान. आणि 'C' श्रेणी मध्ये आलिया परवीन करीम खान, इकरा फातेमा शेख इस्माईल, खन्सा फातेमा अजीमुल्ला खान, नुमेरा नाझमीन अल्ताफ खान, शिफा अनम मुझम्मीओद्दीन, सिदरा फातेमा तौफिक अहमद, तहरीम फिरदौस शेख सनाउल्ला, उम्मे हानी फरमान खान. या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. या यशाबद्दल सर्व स्तरातून डॉ. इक्बाल उर्दू कन्या शाळेचे कौतुक होत आहे.

तसेच समितीचे अध्यक्ष यास्मिन बानो मोहम्मद खुश्तर, उपाध्यक्ष मोहम्मद इर्शाद अब्दुल सत्तार, मुमताज खान रियासत खान, गौस खान रहीम खान, सीमा बी शेख इस्माईल, आमिना सरवत मुजाहिद्दीन, सुमय्या मुजाहिद इक्बाल, फिरोज अहमद मोहम्मद युसूफ, अमजद खान हुसेन खान, नसरीन बी रियाज मोहम्मद खान, रुखसार बेगम मोहम्मद कलीम, शेख इमरान शेख रहीम, फर्जाना बेगम सय्यद रहीम, जिनत परवीन सय्यद जमीर आणि शेख उस्मान शेख अहमद यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

मुख्याध्यापक राहत रोशन अंसारी आणि सर्व शिक्षक वृंदाच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना मान्यवरांनी सांगितले की, शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध आणि आकर्षक बनवण्यासाठी नेहमी असे प्रयत्न सुरू राहिले पाहिजेत असे म्हटले. वरील चित्रकलेची परीक्षा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments