Bay -team aavaj marathi
ऑक्टोबर २०२५ च्या शासकीय चित्रकला ए्लिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात १०० % निकाल जाहीर झाला त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित कै. संत हरिभाऊ आनंदराव घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या केंद्र क्रमांक १०८०३५ चा १०० % निकाल लागला आहे.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी २१८विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यात A ग्रेड ने -३१, B ग्रेड ने- ७१,C ग्रेड ने- ११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ठ १५८ झाले होते. त्यात A ग्रेड ने-५४, B ग्रेड ने- ४६, C ग्रेड ने- ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री.बंडू पैठणपगार व श्री.भरत चव्हाण या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती सुमती ताई घाडगे पाटील,उपाध्यक्षा स्नेहलताई घाडगे पाटील चव्हाण, विश्वस्त श्री.चेतन पाटील चव्हाण, सचिव मनीष घाडगे पाटील, प्रशासक श्रीम.मनिषा राऊत मॅडम,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे सर यांनी अभिनंदन केले.


0 Comments