Bay- team aavaj marathi
एका कुटुंबावर नियतीनं मोठा आघात केला आहे. महिन्याभरात कुटुंबातील दोघांनी वृद्धापकाळाने तर दोघांचा अपघाती असा चार जणांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, बिहारच्या बांका मध्ये राहणाऱ्या अनुपम कुमार यांच्या आईचं निधन झालं. त्यांचं श्राद्ध २३ डिसेंबरला झालं. यानंतर अवघ्या चारच दिवसांत २७ डिसेंबरला अनुपम कुमार यांचे वडील रघुनंदन प्रसाद सिंह यांना देवाज्ञा झाली. ते १०७ वर्षांचे होते.
त्यांचा अंत्यविधी आणि इतर विधी आटोपून परतीचा प्रवास करताना मुळचे मुरादपूर गावात राहणारे अनुपम कुमार हे हवाई दलातून निवृत्त झाले आहेत. हवाई दलात जवान असलेले अनुपम कुमार शनिवारी दिल्लीच्या फरिदाबादला त्यांच्या बोलोरो कारमधून दिल्लीला परतत होते.

या अपघातात बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू

तेव्हा त्यांच्या सोबत कारमध्ये त्यांची पत्नी श्वेता, मुलगी आस्था (२३) आणि मुलगा अनिश (२५) असे तिघे जण होते. कार सनी चालवत होता. दाट धुकं असल्यानं कारनं एका कंटेनरला धडक दिली. तितक्यात मागून एक कार आली. तिनं अनुपम यांच्या बोलोरो ला मागून धडक दिली.
या अपघातात अनुपम आणि त्यांची लेक आस्था यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या अपघातात श्वेता आणि अनिश जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भागलपूर मध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या महिन्याभरात घडलेल्या घटनांनी दोघांना धक्का बसला आहे. कुटुंबातील ४ जवळचे सदस्य त्यांनी गमावले आहेत.
सोमवारी कामावर रुजू होणार होते, पण घातला काळाने घाला...
खेळ कुणाला दैवाचा कळला सोमवारी कामावर रुजू होणार होते, पण पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. सर्व काही सुरळीत चालू असताना मध्येच अनुपम कुमार सैन्यातून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांना हरियाणाच्या फरिदाबाद मील कॅनरा बँकेत नवी नियुक्ती मिळाली. सोमवारीच ते रुजू होणार होते. त्यामुळेच ते वडिलांचे अंत्यविधी आटपून निघाले होते.
अवघ्या महिन्याभरात कुटुंबातील चौघांचा मृत्यू एका कुटुंबावर नियतीनं मोठा घाला घातला आहे. दैवाचा खेळ पाहून कुटुंबाचे नातेवाईक आणि संपूर्ण गाव सुन्न झाला आहे. दुर्दैवी कुटुंबातील चार सदस्यांनी अवघ्या महिन्याभरात जग सोडलं आहे. या कुटुंबासोबत घडलेल्या प्रकारानं प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे.



0 Comments