शौर्य आणि ज्ञानाचा संगम: विद्यालयात जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी.....

 Bay- team aavaj marathi 

शरद आहेर सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व महान विचारक स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व उपस्थितांच्या हस्ते करुन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला " जिजाऊंच्या जीवावर नाही कुणाची पर्वा " हे गीत काव्यांजली देशमुख व श्रावणी काकड यांनी सादर केले.त्यांना संगीत साथ कल्पना अहिरे यांनी दिली. विद्यालयातील प्रियंका धुमाळ, अंजली पवार, पुष्पांजली पवार, रिद्धी पठारे, गीता जावरे, सोनाली शेवाळे, समृद्धी सोनवणे वैदवी महिराळ, साक्षी गायकवाड,आराध्या कवडे साक्षी महाजन या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा धारण केली.

 श्रावणी काकड ,रेणुका खाडे, वेदश्री महाजन ,नम्रता सदगीर ,आराध्या शिंदे ,लावण्या देशमुख हर्षदा कर्नर, स्वराली आहेर, श्रावणी आहेर, आरती आहेर, स्वराली आहेर या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.

 उपशिक्षिका स्मिता केदारे यांनी आपल्या मनोगतात राजमाता जिजाऊंनी केवळ एका राजाला जन्म दिला नाही, तर एक स्वराज्य घडविण्याचा विचार या मातीत रुजवला. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द त्यांनी शिवरायांमध्ये निर्माण केली. सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्या स्वतःच न्यायनिवाडा करत असत. माॅंसाहेब जिजाऊ स्त्री शक्तीचे प्रतीक, एक सक्षम मार्गदर्शक होत्या हे सांगितले.

 यावेळी उपशिक्षिका सुनिता जाधव पर्यवेक्षक अविनाश शेवाळे ज्ञानेश्वर पगार यांनी मनोगत व्यक्त केले, हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले.

Post a Comment

0 Comments