चाळीसगाव तालुक्यातील तळेगांव ते हिरापूर दरम्यानच्या रस्त्यावर हिरापुर गावाजवळील नूरानी मशीद जवळ चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर सोमवारी रोजी दि. १२ जानेवारीच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास भरधाव आयशर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की,मृतांमध्ये दोन संख्या भावांचा समावेश सह तीन तरुण युवकांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये सागर संजय वराडे (वय २७), सोमनाथ संजय वराडे (वय ३२), अक्षय बापू पाटील (वय ३०) सर्व रा.हिरापूर, ता. चाळीसगाव यांचा समावेश आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
या अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला असून रस्त्यावर मृत्यूचा थरार पाहायला मिळाला, घटनास्थळी उपस्थितीत ग्रामस्थांनी गतीरोधक नसल्यामुळे अपघात झाल्याचा, आरोप करीत, संबंधीत विभागावर संताप व्यक्त केला. या ठिकाणी हिरापुर गावाकडून येणारी वाहतूक व शिंदी फाटा गणेशपूर पिंप्री या गावाकडून येणारी वाहतूक चाळीसगाव नांदगाव रस्त्याला मिळते. चाळीसगाव ते छ. संभाजीनगर जाणारी येणारी अवजड वाहतूक कन्नड औट्रम घाटातून उच्च न्यायालयाने बंद केल्याने ही वाहतूक चाळीसगाव नांदगाव वैजापूर मार्गे छ. संभाजीनगर - चाळीसगाव ये- जा करते यामुळे वाहनाची वर्दळ वाढली आहे.
तसेच रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडले आहेत. रस्ता हा खराब झाला आहे.याकडे सबंधित विभागाला जाग येत नाही. याबद्दल नागरिकात संताप वव्यक्त होत आहे. रस्त्यावर अवजड वाहतूक होत असल्याने येथे नेहमी अपघात होत आहे. या सबंधित विभागाला वेळोवळी पत्रव्यवहार करुनही या मागणीकडे दुर्लक्ष केले. अद्यापपर्यंत गतीरोधक टाकण्यात आलेले नाही. अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत ,पंचनामा केला. भरधाव वाहन चालक अपघातानंतर फरार झाल्याची माहिती मिळाली असून पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शीच्या आधारे तपास सुरू आहे.
0 Comments