Bay- team aavaj marathi
नागपूर जिल्ह्यातील रामटेक नाव गंगाबाई सावजी साखरे (वय१०३) दोन महिन्यांपासून अंथरुणाला खिळलेल्या, दोन चम्मच पाण्यावर दिवस काढणे सुरू होते. मृत्यूची वार्ता नातेवाईक आणि पंचक्रोशीत पसरली. अंत्यविधी ची तयारी पूर्ण झाली, नाकात कापूस ठेवण्यात आला, हातापायांची बोटे बांधण्यात आली. अचानक आजीबाई ने पायाची बोटे हलवली. त्या जिवंत असल्याचे समजले. विशेष म्हणजे, आजीबाईचा १३ जानेवारी हा वाढदिवस होता. त्यामुळे अंत्यविधी ऐवजी नातेवाईकांनी आजीबाईचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला.
गंगाबाई या मूळच्या चारगाव (ता. रामटेक) येथील रहिवासी. सध्या रामटेकच्या आंबेडकर वॉर्डांत मुलगी कुसुमा अंबादे यांच्या घरी राहतात. १२ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता त्यांच्या शरीराच्या हालचाली थांबल्याचे दिसताच, कुटुंबीयांनी त्यांना मृत समजले. नातेवाइकांना फोनवरून निरोप देण्यात आला. सोशल मीडियावर निधन वार्ता पसरली. घरासमोर मंडप उभारण्यात आला.
अंत्यविधी ची वेळ ठरविण्यात आली आणि शववाहिका निश्चित करण्यात आली. गंगाबाई ना नवीन वस्त्रे घालून हात-पायांची बोटे बांधण्यात आली. नाकात कापूस ठेवण्यात आला. दरम्यान, दोन तासांनी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास नातू राकेश साखरे यांच्या लक्षात आले की, आजीच्या पायाची बोटे हलली. त्वरित बोटांची बांधणी सोडण्यात आली. नाकातील कापूस काढताच गंगाबाई नी जोरात श्वास घेतला. ही बाब समजताच, उपस्थितांचा क्षणभर विश्वासच बसेना. अंत्यविधी ची सर्व तयारी रद्द करण्यात आली.
आजीबाई ला मिळाले नवजीवन
निधनाची वार्ता मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर, बालाघाट सह दूरच्या भागांतून नातेवाईक रामटेक कडे निघाले होते. काही जण तर हार घेऊन पोहोचले. मात्र, आजी जिवंत पाहून सगळेच स्तब्ध झाले. विशेष म्हणजे, १३ जानेवारी रोजी गंगाबाईचा वाढदिवस होता. या घटनेनंतर त्यांना जणू नवजीवन मिळाले. कुटुंबीयांकडून साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी पर्यंत तांदूळ निवडण्याइतकी दृष्टी चांगली असलेल्या गंगाबाई ची ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.


0 Comments