Team- aavaj marathi
जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जातेगाव येथे 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे सदस्य श्री बोरसे राजेंद्र उत्तमराव यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष माध्यमिक श्री. गोटू गोपीनाथ निकम व सर्व सदस्य तसेच उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष श्री जयवंत यादवराव चव्हाण व सर्व सदस्य जातेगाव ग्रामपंचायतचे सरपंच ,उपसरपंच व त्यांचे सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व त्यांचे सर्व सदस्य सैन्य दलातील जवान ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अर्जुन यशवंत निकम, गावातील ग्रामस्थ, पत्रकार बंधू,आरोग्य अधिकारी व त्यांचे सर्व कर्मचारी तलाठी ,ग्रामसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मराठे एस. एम .यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्तावित श्री शेवाळे ए. एस. यांनी केले.
यानंतर पार पडल्यानंतर गावातून सर्व विद्यार्थ्यांसह प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये देश भक्तीपर विविध गीत ,भाषणे घेण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शेवाळे ए. एस., श्री बच्छाव एन.व्ही,श्री. आहिरे ए. टी, श्री.सदगीर आर .जे. यांनी केले
यावेळी प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री.डी. वाय. चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व श्री.शिंदे पी .जी. माजी शिक्षक यांनी विदयार्थ्यांना बक्षीस वितरण केले.या कार्यक्रम प्रसंगी गावातील शिक्षण प्रेमी,ग्रामस्थ,व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
0 Comments