जातेगाव प्रजासत्ताक दिन उत्साहात मात्र यामुळे ग्रामसभा तहकूब सभा तहकूब

 Tweam- aavaj marathi

जातेगांव येथे शुक्रवार दि.२६ जानेवारी रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आला. या निमीत्याने ग्रामपालिके समोर उपसरपंच पंढरिनाथ वर्पे आणि सर्व ग्रामपालिका सदस्य, वि.वी सेवा सोसायटीचे अध्यक्ष अंकूश पगारे व सर्व संचालक तसेच गावातील प्रतिष्ठत नागरिकांनी ध्वजाचे पूजन केले त्यानंतर सरपंच सौ. शांताताई पवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.


यावेळी सामाजीक, राजकिय, शैक्षनिक, क्षेत्रातील  नागरिक तसेच येथील जिवन शिक्षन विद्या मंदिर या जिल्हा परिषदेचे व मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता विद्यालय, श्री पिनाकेश्वर ॲकेडमी या तीन ही शिक्षन संस्थेचे शिक्षक आणि विद्यार्थी, ग्रामपालिकेचे सर्व कर्मचारी येथील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल बंड यांनी केले.

जातेगाव येथील ग्रामसभेसमोर ध्वजारोहणासाठी जमलेला जनसमुदाय बघण्यासाठी खालील लिंकला टच करा


पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्याने ग्रामसभा तहकूब


नांदगाव तालुक्यातील लोक सखेने क्रमांक तीन चे असलेले व घाटमाथ्यावरील सर्वात मोठे असलेल्या जातेगाव येथे मागील तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्याने प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन या दोन्ही वेळेस इतर ग्रामपालिकेचे अतिरीक्त कामकाज पहानारे ग्रामसेवक येथे असल्याने ग्रामसभेचे सचिव म्हणून येथील शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केली जाते. मात्र हे ग्रामसभेचे सचिव असलेल्या शिक्षकाकडे मागील ग्रामसभेचे प्रोसिडींग बुक नसते, तसेच नागरिकांनी काही मुलभूत सुविधेबाबत मांडलेल्या सुचनांचे ठोस उत्तर नसते. हे तात्पुरर्ते सचिवांनी ग्रामसभेवर नागरिकांनी नागरि सुविधे बाबत मांडलेले प्रश्न ग्रामसभेच्या प्रोसिडींग बुकवर न घेता एका साध्या पेपरवर (कागदावर) लिहुन आणि आलेले सर्व अर्ज ग्रामपालिकेच्या लिपीकाकडे देतात, तसेच ग्रामस्थांनी काही मूलभूत सुविधा बाबत प्रश्न विचारल्या नंतर मला काही सांगता येणार नाही ग्रामविकास अधिकारी आल्यानंतर त्यांना विचारा असे ठोस उत्तर देऊन तात्पुरते ग्रामसभेचे सचिव म्हणून उपस्थित असलेले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आपल्या जबाबदारीतून मुक्त होतात. 

नंतर दुसरे मुख्यालय असलेल्या ग्रामपालिकेचे ग्रामसेवक येथील कार्यालयात येतात त्यावेळी त्यांना ग्रामसभेत मांडलेली प्रश्न किंवा दिलेल्या अर्ज बाबत चौकशी केली असता. ते उवडा- उडवीचे उत्तर देवून वेळ मारून नेतात. असाच प्रकार आज जातेगाव ग्रामपालिकेत घडल्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले. आणि जोपर्यंत ग्रामविकास अधिकारी येत नाही, तोपर्यंत ग्रामसभा तहकूब ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानुसार प्रजासत्ताक दिनाचे निमित्त होणारी ग्रामसभा तहकूब करण्याची नामुष्की येथील ग्रामपालिकेवर आली.

सामाजीक राजकीय व इत क्षेत्रातील घडामोडी या बातम्या आणि इतर नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या youtube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबण्यास विसरू नका

Post a Comment

0 Comments