Team aavaj marathi
नांदगाव येथील जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल व सौ.क.मा. कासलीवाल प्राथमीक/ माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नांदगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री.राजेश कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते ,तसेच समूहनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तर भावना गुढेकर ,प्रियल जाधव ,अनुबिया पठाण या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नगराध्यक्ष राजेशजी (बबिकाका) कवडे,
संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा,जुगलकिशोर अग्रवाल,सुशीलकुमार कासलीवाल ,महेंद्र चांदीवाल,प्रमिलाताई कासलीवाल, श्रीमती शोभाकाकीजी कासलीवाल,आनंद कासलीवाल ,समीर कासलीवाल, प्रतिक कासलीवाल, डॉ. उदय मेघावत, प्रशासन अधिकारी गुप्ता सर, प्रिन्सिपल मनी चावला, मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार, विशाल सावंत, गोरख डफाळ, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
![]() |
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगीता गायकवाड, कावेरी चव्हाण, व पल्लवी रावअंदोरे यांनी तर विजय गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
0 Comments