ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संकुलात 75 वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा

 Team - aavaj marathi

ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित अनुदानित एकलव्य आदिवासी प्राथमिक आश्रम शाळा सारतळे, कैलासवासी बाबूलाल देवचंद पगार माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सारतळे, श्री.स्वामी समर्थ कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सारताळे, सिद्धिविनायक शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे  75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.रमेश आप्पासाहेब पगार यांनी ध्वजारोहण केले.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या कोषाध्यक्ष तथा एकलव्य आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. नम्रता ताई पगार, प्राचार्य रवींद्र भामरे, प्रा.विक्रम घुगे उपस्थित होते. तसेच शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटिका व नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी.पी.सूर्यवंशी सर यांनी केले तर श्री एस एस चौधरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments