Team aavaj marathi
सोमवार दि.२२ रोजी आयोध्या येथे प्रभु श्रीरामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२.३० वा. होत असतांना त्याच दिवशी येथील ह भ प मृदुंगाचार्य परशुराम महाराज पेहेरकर आणि येथीलच रहिवाशी चि.सौ.कां. कावेरी यांच्या शुभ विवाह सोहळ्याचा शुभ मुहूर्त देखील दुपारी १२.५० वाजता होते. हिंदू धर्म रितीरिवाजा प्रमाणे विवाहाच्या बोहल्यावर चढण्यासाठी परशुराम महाराज गावातिल मारुती मंदिरात शेवंती घेऊन देवाचे दर्शन घेऊन विवाहस्थळी वाजत-गाजत जात असतांना. त्याच दिवशी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमीत्याने सालाबाद प्रमाणे होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहच्या सांगतेच्या काल्याच्या कीर्तन सुरू होते.
त्यात श्रीरामांच्या कथेचा विषय सुरु होता. न राहवल्याने किर्तन सेवेत काही वेळ मृदुंग वाजविण्याच्या सेवेसाठी मृदुंगाचार्य परशुराम महाराज यांनी काही मित्र व आप्तेष्टांना सांगून चालु असलेली वरात थांबवून सेवा दिल्याने या कार्यक्रमास उपस्थीत असलेल्या पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी मृदुंगाचार्य परशुराम महाराज यांचे गोडकौतुक केले.
किर्तन सेवेतिल प्रसंग बघण्यासाठी यूट्यूब लिंकला टच करा
याप्रसंगी बोलताना ह भ प परशुराम महाराज यांनी सांगितले की शेकडो वर्षापासून देशातील हिंदू बांधवांचा श्रीरामाच्या मंदिरासाठी लढा सुरू होता योगायोगाने तो माझ्या विवाहाच्या दिवशी त्याच मुहूर्तावर पुर्णत्वास जात होता. न राहवल्याने मी थोड्यावेळ माझी लग्नाची वरात मिरवणूक थांबवून माझ्या नातेवाईकांना व मित्र परिवारास सांगितले आगोदर प्रभु श्रीरामाचे काम नंतर शुभ मंगल सावधान माझ्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले, व मला चालू असलेले कीर्तनात मृदुंग वाजविण्याच्या सेवेला परवानगी दिली.
0 Comments