मराठा आरक्षण लढ्याला यश. आ. कांदे यांनी पेडे वाटून केला आनंद साजरा.

 Team- aavaj mararhi

सकल मराठा समाज व मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी ज्या मागण्या केल्या त्या महाराष्ट्र सरकारने मान्य केल्याबद्दल शासनाचे प्रतिनिधी व नांदगाव तालुक्याचे आमदार श्री सुहास आण्णा कांदे साहेब यांचा शाल पुष्पगुच्छ व पेढा भरून मराठा समाजाच्या आभार व्यक्त करुण सत्कार करण्यात आला. 

या वेळी मा.आमदार संजयभाऊ पवार मा.नगराध्यक्ष बबिकाका कवडे, मा.सभापती विलासभाऊ आहेर, मनमाड बाजार समिती संचालक विठ्ठलआबा आहेर मा.नगरसेवक नंदुभाऊ पाटील,  मा.संचालक भरत आबा शेलार, अनंतभैय्या आहेर,  अशोक निकम ,बाबासाहेब आहेर शरद काजळे ,बंडू थेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

    
या वेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी जरांगे पाटील यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या मराठा बांधवांचा सत्कार केला. व पेडे वाटून आनंद साजरा केला, दरम्यान मराठा आरक्षण लढा सुरु झाला तेव्हापासून आ.सुहास आण्णा कांदे यांनी मराठा आरक्षणाला पाठींबा दिला होता. आणि मराठा आरक्षणासाठी प्रसंगी आमदार पदाचा राजीनामा ही देऊ असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे मागण्या मान्य होताच आमदारांची भेट घेऊन समाज बांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली



Post a Comment

0 Comments