अखेर त्या अपघातातील तरुणाची मृत्यूची झुंज ठरली व्यर्थ

 Team- aavaj marathi



दिनांक २७ जानेवारी रोजी वैजापूर तालुक्यातील वाकला येथील तरुण शेतकरी निकम (वय ३५) त्याने आपल्या शेतातील वांगे एम.एच.२० सि.एल.४६३८ या बजाज डिस्कवर मोटारसायकलने नांदगाव येथील बाजार समिती मध्ये विकण्यासाठी सकाळी लवकर  चार कॅरेट भरून वांगे घेऊन जात असताना. कासारीच्या अगोदर लागणारा चांदेश्वरी या अवघड वळनाच्या घाटामध्ये मोटार सायकल वरील ताबा सुटल्याने मोटार सायकल सह खोलदरीत पडल्यामुळे डोक्याला व इतर ठिकाणी मार व इतर ठिकानी मार लागल्याने जखमी झाला होता. 

त्यास स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून बोलठाण हून नांदगावच्या दिशेने जाणाऱ्या बस मध्ये पुढील उपचारासाठी नांदगाव येथे पाठविले होते. तेथील डॉक्टरने प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी पुढे जाण्याचा सल्ला दिला असताे नातेवाईकांनी त्यास चाळीसगाव येथे उपचारासाठी नेले होते. उपचार सुरू असताना दुपारी सोनोग्राफी करण्याचा येथील डॉक्टरने सल्ला दिला त्यापूर्वीच मृत्यूची झुंज व्यर्थ ठरली व १ वाजेच्या सुमारास त्याचे निधन झाले त्याचे पश्चात आई वडिल, पत्नी, एक मुलगा,एक मुलगा असा परिवार असून त्याच्या निधनाची वार्ता समजताच वाकला येथे शोक वाकला पसरली होती.


Post a Comment

0 Comments