कृषी विभागाच्या वतीने जातेगाव येथे सुचित्रा वानाची ज्वारी पिक पाहणी

 Team --aavaj marathi

K.k. mahale 

जातेगाव येथील महात्मा फुले शेतकरी गटातील शेतकर्यांनी महाराष्ट्र शासन कृषि विभागाने दिलेल्या ज्वारीच्या फुले सुचित्रा वानाची बियाणाची लागवड केली होती, दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही गटातील सर्व शेतकऱ्यांनी ज्वारीस अल्प प्रमाणात पाण्याचे व्यवस्था करुन ज्वारीचे भरघोस उत्पन्न देखील घेतले. या ज्वारी पिकाची प्रत्यक्ष पाहणी नांदगाव तालुका कृषी विभागामार्फत करण्यात आली व कृषी विभागाच्या वतीने शेतकरी बांधवांच्या अभिनंदन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्याचे मानवी जीवनातील महत्त्व त्यासाठी कृषी विभागामार्फत उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे मालेगाव यांच्या मार्फत शेतकऱ्याच्या शेतात जाऊन ज्वारी पीक प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी नेरकर, मंडल अधिकारी राजेंद्र काळे, पर्यवेक्षक मेहरे उपस्थित होते. उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना ज्वारीचे महत्त्व समजावून सांगितले.

यावेळी महात्मा फुले शेतकरी गटाने त्यांचे अभिनंदन केले, याप्रसंगी ग्रामपालिका सदस्य बाळासाहेब लाठे, संदीप पवार, राजू शेख शेतकरी गटातील दादासाहेब सोनवणे, राऊत, अरुण सोनवणे, संतोष पवार सर्व सभासद उपस्थित होते. त्याचप्रमाणे नाशिक येथे झालेल्या कृषी प्रदर्शनासाठी महात्मा फुले शेतकरी गटाने आपली उपस्थिती नोंदविली होती. ग्रामपालिका सदस्य संदीप पवार यांनी सदर कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व उपस्थित सर्व शेतकरी वर्गास समजावून सांगितला व उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments