नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा

 Team-- aavaj marathi 


नांदगाव (प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे नुकताच विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून गझलकार काशिनाथ गवळी यांनी विविध कविता आणि गझल सादर करुन विद्यार्थ्यांची मने जिंकली.

गझलेतुन केवळ प्रेमाच्या गझला होतात असे नाही तर आता सामाजिक समस्या मांडण्यासाठी देखिल गझल होऊ लागल्या आहेत. म्हणून कविता आणि गझल समजून घेऊन महाविद्यालयातील तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कवी आणि गझलकार होऊ शकतात असा विश्वास गवळी यांनी विद्यार्थ्यांना दिला.व, प्रत्येक समस्यांना सामोरे जा,कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही.म्हणुन समस्यांना सोडुन पळुन जावु नका‌ . व व्यसनापासून दूर रहा असा संदेश गवळी सरांनी आपल्या व्याख्यानातुन विद्यार्थ्यांना दिला.

व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक ॳॅड. सचिन गुळवे, प्रमुख अतिथी नांदगाव तालुका संचालक व कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगावचे संचालक अमित बोरसे (पाटील), संस्थेचे सदस्य शरद पाटील, सर्जेराव पाटील, विजुभाऊ चोपडा, करवा, विजय काकळीज,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक ॳॅड.सचिन गुळवे हे होते.



 त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व स्पर्धेत जिंकले त्यांचे अभिनंदन पण ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे खरे अभिनंदन केले पाहिजे कारण त्यांनी सहभाग घेतला नसता तर स्पर्धाच झाली नसती. तुम्ही जीवनात यशस्वी व्हा, अडचणी आल्यास तुमच्या शिक्षकांचे यांचे मार्गदर्शन घ्या ,तुमचे संचालक अमित पाटील संस्थेसाठी तळमळीने काम करतात व समस्या सोडवतात येत्या वर्षांपासून होरायझिंग ॳॅकेडमी सुरु होत आहे या ॳॅकेडमीचे काम श्रीमती मढे मॅडम पाहात आहे. असे,ॳॅड.सचिन गुळवे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, तर चार भिंतींच्या आत शिक्षण घेतात पण प्रत्यक्षात विद्यार्थी कृतीतून आपली कला, कौशल्य व गुण सादर करण्यासाठी मविप्र संस्था विविध उपक्रम राबवित असते. विद्यार्थ्यांनी आपल्यातील गुण ओळखून तुम्ही तुमचे क्षेत्र निवडा व त्या क्षेत्राला योग्य न्याय दिल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी होणार हे नक्की आज ग्रामीण भागातील अनेक युवक विविध क्षेत्रात प्रगती करत असल्याचा आनंद वाटतो. असे संचालक अमित बोरसे (पाटील) मनोगतात म्हणाले. 



अनेक दानशूर व्यक्तींनी महाविद्यालयाच्या विकासाला हातभार लावला त्यामुळे महाविद्यालयाची भौतिक प्रगती झाली. व महाविद्यालयाच्या सर्वच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि संस्थेच्या पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्याने महाविद्यालयाला नॅक कमिटीने "ए" ग्रेड मिळाली याचा आनंद वाटतो.महाविद्यालयाची प्रगती होत असल्याने मी समाधानी आहे असे प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे यांनी मनोगतात मत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात महाविद्यालयाने वर्षभरात केलेल्या प्रगतीचा आढावा स्नेहसंमेलन प्रमुख उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे यांनी सांगितला. विद्यार्थ्यांनी वर्षभरात विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये गुणवत्ता ,व कार्यकुशलता उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचे व यशस्वी प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह,व मेडल्स देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती डॉ.जे.डी.पवार यांनी केले. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे संचलन प्रा. भोसले यांनी केले. तर क्रीडाक्षेत्रातील संचलन प्रा.एल.एम.गळदगे तर मविप्र युवा स्पंदनचे संचलन प्रा. वाघ तर राष्ट्रीय सेवा योजना चे संचलन प्रा. बी. बी. मोरे यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. डी.एम.राठोड यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. जी.एच.जैन, प्रा. निगळे, ज्युनिअर कॉलेज सत्र प्रमुख प्रा. आर.टी.देवरे, प्रा. पी.एम.आहेर, प्रा.जाधव, एम.व्ही.दिवटे,आहेर,पवार ,आदि प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले . संस्थेचे सदस्य,पालक, पत्रकार व विद्यार्थी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments