Team-- aavaj marathi
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून रविवारी लोकार्पण सोहळ्यानिमित्त स्वराज्याच्या राजधानी असलेल्या रायगडावरून पवित्र जल व माती आणण्यात आली, शिवसेना संपर्क कार्यालय मनमाड येथे या कलशाचे ढोल ताशेंच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले. शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी कलशधारी व कलशाचे आरती स्वागत केले.
दोन दिवस आधी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या आदेशाने मनोज ससाने दिनेश घुगे शशी भाऊ सोनवणे जीवन पाटील गणेश पगार मंगेश पगार विलास शेळके सचिन उदावंत यांनी रायगडावर जाऊन पवित्र जल व माती आणली.
यावेळी बोलताना शिवसेना शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे यांनी या पवित्र जलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जलाभिषेक केले जाणार असल्याची माहिती सांगितली तसेच हे दोन्हीही कलश शिवसेना संपर्क कार्यालय मनमाड येथे दर्शनासाठी दोन दिवस ठेवले जाणार असल्याची माहिती दिली.

0 Comments