येथील पोलीस स्टेशनच्या बैठक सभाग्रहात शांतता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होतो या प्रसंगी छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आणी मोहरंम हे सन शांततेत व सलोख्यात साजरे करावे. असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती ,पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन, पो. नि. प्रितम चौधरी,पो. उ. नि. संतोश बहाकर प्रा वाल्मीक जगताप, संतोश गुप्ता यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी श्री महाजन म्हणाले की संविधान हक्का प्रमाणे कर्तव्य बजवावी उत्सव साजरा करताना संयम ठेवा चुकीच्या गोष्टी करु नका चांगल्या सूचनांचा आदर करु सण चांगले साजरे करु या शिवजयंती उत्सव व मोहरंम या उत्सवाचा विचार करता शांततेत साजरा करावा. दैनंदिन कार्याला आडथळा येणार नाही कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी ,डिजे वाद्याला परवानगी नाही तरी डिजे वाद्याचा वापर करु नये वेळेत कार्यक्रम पूर्ण करा यावेळी चर्चेत उल्हास कदम हमालवाडा, जगदीश दुसाने यांनी भाग घेतला उत्सव समिती, गुलाला एैवजी फुले व त्यांच्या पाकळ्या चा वापर करावा यातुन रोजगार देखील मिळतो, नांदगांव शहरात दोन शिवजयंती मिरवनुक, हिसवळ, पळासी येथे खंडेराव महाराज याञा शांततेत पार पाडावे. हिंदु मुस्लीम एकोपा निर्माण करा, शहर आपले आहे आपण शांतता ठेवावी मिरवनुक मार्ग निश्चित करा व्यसनमुक्त मिरवनुक काढा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी अभिषक इघे,कपिल तेलोरे, राजेश पवार, मुस्ताक भाई सैय्यद, काजी, इकबाल, आयुब ,सह मुस्लींम बांधव उपस्थित होते १९ फेब्रुवारी शिवजयंती व २३ रोजी मोहरम सण साजरा होत आहे या दरम्यान मिरवनुक मार्ग, आक्षेपार्य पोस्टर किंवा देखावे करु नये. मिरवनुक वेळेत पूर्ण करा, तालुक्यात ३३ शिव जयंती परवाणग्या देण्यात आलेल्या आहेत. ४ ठिकाणी श्री छञपती पुतळा पजन, फोटोपुजन तालुक्यातील नांदगांव पोलीस हाद्दीत ७२ गावे असून या बैठकीला मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते. वरील बैठकीसाठी पो. काॅ. दत्तात्रय सोनवने यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments