गुरुवार दि.१५ फेब्रुवारी रोजी नांदगाव तालुक्यात संत सेवालाल महाराज २८५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रामुख्याने न्यायडोंगरी, सावरगाव, ढेकू खुर्द, पिंप्राळा येथील बंजारा तांड्यावर झालेल्या कार्यक्रमात सौ. अंजुमताई कांदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या याप्रसंगी मतदार संघातील बंजारा समाजावर आ. सुहास अण्णांचे विशेष प्रेम असल्याने त्यांनी बंजारा समाजासाठी मुख्यमंत्री ना.शिंदे यांच्याकडून तांडा सुधार निधि अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आनला असल्याचे प्रतिपादन समाजसेविका सौ.अंजुम सुहास कांदे यांनी केले.
सौ.कांदे पुढे म्हणाल्या की, तांडा सुधार निधीतून प्रत्येक तांड्यावर पिण्याचे पाणी,सिमेंटचे रस्ते, नागरिकांसाठी मुलभूत सुविधा, स्मशानभूमी अदी कामे केली जाणार आहेत. तर या अगोदर ही आमदार निधीतून प्रत्येक तांड्यावर संत सेवालाल महाराज यांचा पुतळा व सभामंडप दिले आहेत. यापुढे ही विकासकामांचा झंजावात सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बंजारा समाजातील अनेक मान्यवरांनी आमदार सुहास कांदे करत असलेल्या विकासकामांची स्तुती केली. त्यात एन.के.राठोड, नारायण पवार, भगवान सातपुते, उमेश मोरे, ढेकूचे उपसरपंच राजेंद्र चव्हाण, ढेकू येथील प्रमुख अतिथी असलेल्या सौ.कांदे यांच्या हस्ते ढेकू तांड्यातील १०५ वर्ष वय असलेल्या ज्येष्ठ महिला सौ. बमणीबाई हाकाजी पवार यांचा ज्येष्ठ महिला म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित समाज बांधव व नागरिकांनी ढेकू येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्यास तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्त दान केले.
जयंती उत्सवाच्या निमित्ताने या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ. विद्या जगताप, शहरप्रमुख सौ. रोहिणी मोरे, सौ.पूजा छाजेड, सौ.संगीता बागुल, निशा चव्हाण, किरण कांदे, अण्णा मुंडे, रमेश काकळीज, दिपक मोरे, लक्षण राठोड, आबासाहेब भुसारे, राम राठोड, विकास सोसायटी अध्यक्ष काळू शिंदे, सोमनाथ चव्हाण, शांताराम राठोड, वाल्मिक निकम, अंबादास निकम, रमेश माळी, धनराज जाधव, श्यामजी जाधव, सचिन माळी, विजय राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण, बाबुराव चव्हाण, बाबू चव्हाण, गोपालाल राठोड, अवलीबाई चव्हाण, शेवन्ताबाई चव्हाण, रमेश चव्हाण, सुभाष चव्हाण, मोतीलाल चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, जगन जाधव, दिनकर पवार, गणेश चव्हाण आदिंसह शेकडो बंजारा समाज बांधव उपस्थित होते.
ग्रामपंचायत ढेकू येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी
ढेकू ग्रामपंचायत येथे प्रमुख अतिथी म्हणून श्री गुलाब भाऊ चव्हाण ( समाजसेवक )यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार घालण्यात आला. यावेळी सरपंच आनंदराव सूर्यवंशी, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गायके,सुभाष भाऊ राठोड, रवींद्र भाऊ चव्हाण, विजू भाऊ सूर्यवंशी तसेच शिपाई नागेश यादव, पाणी पुरवठा कर्मचारी पुंडलिक राठोड आणि कविता सूर्यवंशी आणि विनोद राठोड फौजी, ललित राठोड तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते...
0 Comments