आमदार सुहास आण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील तरुण-तरुणींना रोजगार मिळावा या हेतूने नांदगाव शहरातील शिवनेरी या शासकीय विश्रामगृह येथे आज भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
महिंद्रा अँड महिंद्रा बजाज सन्स, हिताची जळगाव, रिंग प्लस एक्वा, लुपिन फार्मासुटिकल, व्हीआयपी टपारिया टूल्स गॅब्रियल ग्लेनमार्क एमडी इंडस्ट्रीज आदींसह अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
मतदार संघातील बेरोजगार तरुणांनी मोठ्या संख्येने या संधीचा फायदा घेण्यासाठी गर्दी केली.आज शनिवार दि.२४ रोजी झालेल्या रोजगार मेळाव्यात तालुक्यातील ८२३ तरुण-तरुणींनी नोकरी करीता मुलाखत दिली. यामध्ये ४१७ जणांना तात्काळ नोकरीचे ऑफर लेटर देण्यात आले तसेच काहींना पुढील इंटरव्यू साठी नाशिक येथे बोलावण्यात आलेले आहे.
या मध्ये दहावी बारावी पास नापास आयटीआय डिप्लोमा डिग्री तसेच फार्मासिटिकल व सिविल इंजिनियर यांचा समावेश होता. मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून रोजगार मेळाव्याच्या आयोजनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच वर्तमान पत्राद्वारे आधीच देण्यात आली होती. यामुळे मोठ्या संख्येने बेरोजगार तरुण -तरुणींनी या संधीचा लाभ घेत उपस्थित झाले होते.
या वेळी बोलताना सौ.अंजुम ताई कांदे यांनी हा नांदगाव मतदार संघातील सातवा रोजगार मेळावा आहे आणि तालुक्याच्या विकासाबरोबर अण्णा तरुणांच्या भविष्याच्या विकासाबाबत नेहमी विचार करून कार्य करतात असे सांगितले.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रवी देवरे सरचिटणीस महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेना यांनी मेहनत घेतली. या प्रसंगी नांदगाव शहराचे नगराध्यक्ष राजेशजी कवडे माजी सभापती विलास भाऊ आहेर किरण अण्णा कांदे ज्ञानेश्वर कांदे, बाजार समितीचे संचालक दीपक मोरे, भैय्यासाहेब पगार, संजय आहेर, नंदू पाटील, गुलाब भाबड, सागर हिरे, प्रकाश शिंदे, सुनील जाधव, राजाभाऊ देशमुख, प्रहार संघटनेचे संदीप सूर्यवंशी, भाऊराव भाऊ बागुल, शशिकांत सोनवणे, रमेश काकळीज, बापू जाधव, उमेश मोरे, निशांत बोडके आदींसह शिवसेना महिला आघाडीच्या विद्याताई जगताप संगीताताई बागुल, पूजाताई छाजेड, रोहिणी ताई मोरे, तपासून शेख, विद्या कसबे, संगीता सांगळे, भारती बागोरे, सोनिया सोर, निशा चव्हाण, जयश्री डोळे आदींसह शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments