दिनांक १७ मार्च २४ येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता दहावीच्या CBSE च्या पहिल्या बॅचला निरोप देण्यासाठी स्प्लॅश पार्टीचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व सरस्वतीच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनीलकुमार कासलीवाल तसेच संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य श्री. मणी चावला, सौ. क .मा. कासलीवाल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.शरद पवार तसेच सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी, शाळेविषयी असलेल्या आपल्या भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी छान असे ग्रुप डान्स सादर केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजनही या पार्टीमध्ये करण्यात आले होते. या स्प्लॅश पार्टीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या त्यांच्या वर्षभराच्या कार्यानुसार शाळेचे प्राचार्य ,उपस्थित जज व शिक्षक यांच्या सहमताने विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना वेगवेगळे अवाॅर्ड देवून गौरविण्यात आले.
यामध्ये सुडंट ऑप द इयर व मास्टर जे.टी.के.इएमएस अॅवार्ड मास्टर रोनक गंगवाल यास तर मिस जे.टी.के.इएमएस अनुष्का सोनवणे यांना देण्यात आला. त्याचबरोबर प्रिन्सिपल चॉईस अवॉर्ड मिस अनुष्का पगार, मास्टर आणि मिस चार्म अवॉर्ड यश शिंदे आणि प्रीती सरोदे यांना देण्यात आला. टॅलेंट हण्ट विनर अवाॅर्ड तन्मय दगडे व मिस कार्तिकी पाटील यांना देण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट ड्रेस आणि सर्वोत्कृष्ट स्माईल अवॉर्ड मुलांमध्ये युग चावला तर मुलींमध्ये मिस अनुष्का पगार,व प्रण्या शिरसाट या विद्यार्थ्यांना देण्यात आला.
याशिवाय यासारखे आणखी 19 विविध प्रकारचे अवॉर्ड सेगमेंट देवून विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. या सर्व कार्यक्रमास जज म्हणून राहुल आहेर, निलोफर पठाण, अश्विनी देसले, वासू आहेर, पल्लवी राओंदरे तर हेड जज म्हणून इयत्ता दहावीच्या वर्ग शिक्षिका सौ मोहिनी देसले यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. शाळा सोडताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे सर्व परिसर भावूक झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली घुगे व शैलेंद्र दामले यांनी केले.
सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच सेक्रेटरी विजय चोपडा, रिखबचंद कासलीवाल ,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र भाऊ चांदिवाल, प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता, प्रिन्सिपल मणी चावला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments