मेघा जगधने ची राष्ट्रीय सब ज्युनिअर शूटिंग बॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी

 Bay-- team aavaj marathi 

मारुती जगधने पत्रकार -- नांदगाव

उत्तर प्रदेश गजियाबाद येथे ऑल इंडिया शूटिंग बॉल फेडरेशन इंडिया आणि उत्तर प्रदेश शूटिंग बॉल यांच्या संयुक्त विद्यमाने दि 28 मार्च ते 31मार्च राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेश संघाचा पराभव करून विजेते पद मिळविले. महाराष्ट्र संघात सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी मेघा जगधने हिने अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश विरूद्ध उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन व अशोक बागुल यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

 शुटिंग बॉल स्पर्धेतील हे उल्लेखनीय यश मिळविल्या बद्दल संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमार जी कासलीवाल तसेच उपाध्यक्ष सुशीलकुमार कासलीवाल, सचिव विजय चोपडा,सहसचिव प्रमिला कासलीवाल, महेंद्र चांदीवाल

, जुगलकिशोर अग्रवाल, प्रशासन अधिकारी गुप्ता सर‌, तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन व अशोक बागुल यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


त्याच प्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार,विशाल सावंत, प्राचार्य मणी चावला, गोरख डफाळ यांनी देखील या विद्यार्थीनीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात या प्रसंगी विद्यार्थी व पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments