नांदगाव: जि.प.शाळा हिसवळ खुर्द शाळेने हिसवळ खु. गावात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.गावातुन जातांना विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीच्या माध्यमातून घोषणा देत मतदानाविषयी जनजागृती केली, या मध्ये ग्रामस्थांनी देखील सहभाग नोंदविला.
यावेळी गावातील चौकात ठिकठिकाणी गावकऱ्यांना मतदाना विषयी माहिती समजून सांगितली, याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. कल्पना सरोदे मॅडम यांनी सर्व गावातील, ग्रामसेवक , माध्यमिक विद्यालय, अंगणवाडी आशाताई गावातील बंधू-भगिनीनी आपला मतदान चा हक्क दिनांक 20 मे रोजी मतदान केंद्रावर जाऊन बजवावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार मानुन.सर्व शिक्षक बंधु भगिनी व विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments