बोलठाण येथे खाजगी जागेतील सुरु केलेले कांदा लिलाव बाजार समिती सचिवांनी बंद पाडले या घटनेचा प्रहार संघटनेने निषेध केला तर लिलाव नियमित सुरु करण्याची शेकर्यांची मागणी.
मारुती जगधने पत्रकार नांदगाव, नाशिक
तालुक्यातील बोलठाण येथे नियमनमुक्तीचा आधार घेत एका खाजगी जागेत कांदा लिलाव सुरु केले असता ते लिलाव बे कायदेशीर असल्याचे सांगून बाजार समितीने ते लिलाव बंद पाडले या वरुन व्यापरी, प्रहार संघटनेचे पदाधिकारी व बाजार समित सचिव यांच्यात फोनवरुन समज गैरसमजाचे बोलणे झाले. या बोलण्याचे प्रहारसंघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सुर्यवंशि यांनी निषेध केला. या संदर्भात व्यापरी, प्रहारचे पदाधिकारी व सचिव यांच्यात झालेल्या फोनवरील शाब्दीक चकमकित विनापरवाना चालु केलेले कांदा लिलाव बंद केले. बोलठाण येथील कांदा लिलाव सुरु करण्यावरुन झालेल्या वादात व्यापार्यांना नांदगाव बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांनी कांदा लिलाव संर्दभात फोनवर धमकी दिल्याचा आरोप करीत प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख सुर्यवंशी यांच्या कडून जाहीर निषेध करुन विष प्राशन करूण आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आला.
दरम्यान नासिक जिल्हातील बाजार समित्या १६ दिवसापासून बंद असल्याने सोमवारी दिनांक ८ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नासिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संबधीत घटकांची बैठक झाली मात्र त्यात कुठल्याही प्रकारचा तोडगा निखाला नाही. मंगळवार दि. ९ रोजी जिल्हाभरातील विविध बाजार समितीतील व्यापार्यांनी तात्पुरता पर्याय म्हणून शेतकर्यांना आवाहन करूण खाजगी जागेत कांदा लिलाव सुरू करूण कुठल्याही प्रकारची हमाली,तोलाई, वाराई कपात न करता शेतकर्यांना रोख स्वरूपात पेमेंट केले.
घाटमाथ्यावरील बोलठाण येथील व्यापार्यांनी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख संदिप सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बोलठाण येथे कांदा लिलाव सुरू केला, असता बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांनी बोलठाण येथील व्यापारी गोकुळ कोठारी यांना फोन वरूण इशारा वजा धमकी देत तुम्ही हा लिलाव बंद करा . नाहीतर मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेल असे आरोप करत, तुमचे परवाने निलंबित करेल अशी धमकी दिल्याचे म्हटले.
त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी सचिव खैरनार यांना फोनवर सांगितले की तुम्ही १६ दिवसापासून बाजार समित्या बंद करूण ठेवल्या आहे . आमच्या शेतकरी बांधवानी कांदे कुठे विकायचे . तुम्ही जर व्यापार्यावर कायदेशीर कारवाई केली ' व आमच्या कांदा लिलावास विरोध केला तर मी व माझ्या सह येथील सर्व शेतकरी विषप्राशन करूण घेवू व यास बाजार समिती सभापती, सचीव आणि पदाधिकारी हे जबाबदार राहतील तसेच या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो असे सुर्यवंशि यांनी म्हटले.
जाहीर निषेध :
नांदगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांनी शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणाऱ्या खरेदीदार ग्राहकांना कायद्याचा धाक दाखवून कांदा खरेदी तत्काळ बंद करण्याचे जुलमी फरमान केले. ह्या सगळ्यांचा निषेध केला व आमचा कांदा खरेदी बंद करणाऱ्या सचिव सभापती यांच्या नावाने विष प्राशन करू. असा पवित्रा घेतला.व्यापारी बांधव कृषी उत्पन्न बाजार समित्या मध्ये मागील २० दिवसापासून लेवीचा वाद चालू असल्यामुळे मार्केट पूर्ण पने बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्याची भरपाई कोण करणार..मुळात कांद्याचा, मकाचा. ट्रॅक्टर हाड्रोलीक करून खाली होतो तोलई प्लेट काट्यावर ५०रू. देऊन करून घेतात मग कृषि उत्पन्न बाजार समित्यांना प्रति क्विंटल१०.५६ पै. म्हणजेच प्रति वाहन किमान ३०० रू का द्यावे. ह्या सगळ्या अन्याया विरुध्द शेतकरी बांधवांनी एकत्र यावे हि विनंती.. इतक्या दिवस मार्केट बंद ठेवणे कुठल्या कायद्यात आहे हे सचिवांनी हे सांगावे.. बस झाल खूप लुटल शेतकऱ्यांना यापुढे नाही...
संदिप सूर्यवंशी प्रहार शेतकरी संघटना नांदगाव
प्रतिक्रिया : नियमनमुक्ती नियमात उत्पादकांना ग्राहकाला माल विकण्याचा अधिकार आहे तो माल लिलाव करुन व्यापार्याला देता येत नाही त्यासाठी पनन मंडळाची परवानगी घ्यावे लागते तर हमाली तोलाई कपात हे बाजार समितीच्या नियमात आहे पनन मडळाची बोलठाण व्यापार्यांनी परवानगी न घेता लिलाव सुरु केले, त्यासंदर्भात पनन मडळाची परवानगी घ्यावी लागते असे लिलाव बे कयदेशीर आहे.
तर नियमनमुक्ती हि शेतकर्या साठी आहे. तसेच शेतकरी ग्राहकाला माल विक्री करु शकतो पण व्यापर्यांना नाही यात नियमाचा चा भंग होतो, त्यामुळे व्यापाऱ्यांना डायरेक माल खरेदी कराता येत नाही. शेत मालाची वाहने बोलवुन लिलाव प्रक्रिया व्यापार्यांनी केली पुन्हा तसे केल्यास गुन्हा दाखला करु माल विकण्याचा उत्पादकाला अधिकार आहे.
0 Comments