नाशिक जिल्ह्यात नांदगांव बस आगाराचे उत्तपन्न ग्रामीण मध्ये सर्वाधिक आहे, मात्र असे असताना नांदगांव आगाराला इतर आगारातील जुन्या झालेल्या डबड्या बस का देतात असा सवाल प्रवासी करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ३० रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान नांदगांव बस स्थानकात प्रवासी व शालेय विद्याथ्यांची दररोज प्रमाणे गर्दी झाली दिवस मावळत चालला होता. प्रत्येकाला पावसाचे दिवस असल्याने बस पकडून घरी जाण्याची चिंता होती यातच नुकतीच बस डेपोतुन. दुरुस्ती व स्वच्छ करुन एक बस स्थानकात आली ति बस बाणगांव भौरी जानार असल्याने प्रवाशांची गाडीमध्ये बसण्याची लगबग सुरू झाली. प्रवाशांनी बस भरुन गेली. परंतु या चालकाने प्रयत्न करुन बसचे इंजिन चालूच होईना.
या बसचे वाहक भाबड हे एकटेच धक्का देत होते, परंतु गाडी हलेना अखेर गाडीतील प्रवासी व विद्यार्थ्यांनी हात लाऊन धक्का दिला पण बस चालू झाली नाही. अशा एकाचवेळी दोन बसेस फेरीला निघण्यापूर्वी स्थानकात बंद पडलेल्याने गावाकडे जाण्याची ओढ लागलेल्या महिला, अबालवृद्ध, विद्यार्थी विद्यार्थिनी यांची तारांबळ उडाली असल्याने जिल्ह्यात नांदगांव आगार हा सर्वात जास्त उत्पन्न देणारा बस डेपो असतांनाही प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे असलेल्या ब्रिद वाक्य विसरून प्रवाशांची गैरसोय करण्यात नांदगाव आगारातील कर्मचार्यांना धन्यता वाटते की काय, कारण नांदगाव आगाराच्या बस वारंवार रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले असतांना गाड्यांचे मेंटेनन्स वेळीच का करत नाही,अशा प्रतिक्रिया यावेळी उमटल्या.
येथे परिवहन महामंडळ दुसर्या बस डेपो मध्ये वापरलेल्या जुण्या डबड्या बसेस देवून तालुक्यातील प्रवाशांच्या भावनांशी खेळत असल्याची संताप जनक प्रतिक्रिया यावेळी उपस्थित प्रवाशांकडून उमटल्या, नांदगांव आगाराला कधी चांलल्या बस मिळतील व प्रवाशांचा प्रवास आनंदी होईल व कधि विद्यार्थ्यांना वेळेत बस मिळतील असा सुर उमटला.
0 Comments