मतदानाची भरली मनात भरली धडकी म्हणूनच बहीण झाली लाडकी - शिरीषकुमार कोतवाल

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने आज पर्यंत अस्वासनांचा पाऊस पाडला, पोकळ आश्वासने दिली.असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी नांदगांव येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना केले. यावेळी  नांदगांव विधानसभेची जागा पुन्हा काँग्रेसला मिळावी अशी मागणी कार्यकत्यांनी लाऊन धरली.

दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आढावा बैठकी दरम्यान पारंपारिक काँग्रेसचे विचाराचा असलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाला देण्यात यावी याकरिता काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक नवीन तहसील कार्यालया  जवळील सप्तशृंगी हॉल येथे आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमास माननीय जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल व माजी आमदार अनिल  आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. येत्या विधानसभा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून नांदगाव विधानसभा मतदारसंघाची जागा परंपरागत असलेला मतदार संघ काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावा याकरिता हात उंचावून ठराव करण्यात आला.

सन२०१४ पासून ते आज पर्यंत महायुतीच्या शासनाने वेळो- वेळी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण भारतात मतदानाच्या टक्केवारी प्रचंड प्रमाणात घट झाल्याने  महायुतीतील घटक पक्ष मनातून धास्तावले असून यापुढे आपल्या भुलथापांना जनता बळी पडणार नाही म्हणूनच वेगवेगळ्या योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडल्या जात आहे.

गेल्या दहा वर्षात जे एकही आश्वासन पूर्ण करू शकले नाही, ते जाता जाता केलेल्या घोषणांची पूर्तता कशी करणार हे फक्त येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर लक्ष ठेवून वेगवेगळ्या योजनांचा धडाका सुरू असून पराभव समोर दिसत असल्यानेच या सगळ्या पोकळ आश्वासनांचा पाऊस पाडल्या जात आहे. असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाचे नाशिक जिल्ह्याध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी केले नांदगाव मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून पक्ष बांधणी मजबूत करणे कामी प्रत्येक तालुका व मतदार संघात कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे त्याचबरोबर पक्ष बांधनी कामी बूथ लेव्हल पासून ते ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या स्तरावर वेगवेगळे गट संघटित करून काँग्रेस पक्षाला बळकटी आणण्याचा नियोजित कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नांदगाव मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा सप्तशृंगी हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री कोतवाल हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 

यावेळी संपूर्ण मतदारसंघातील काँग्रेस वर प्रेम करणारे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आ.ऍड अनिलदादा आहेर यांनी गेल्या पंधरा वर्षापासून नांदगाव मतदार संघातल्या भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाबाबत भाष्य करून काँग्रेसला भवितव्यात चांगले वातावरण असल्याने यापुढे बाहेरचा उमेदवार लादण्यात येऊ नये स्थानिक उमेदवार देण्यात यावा व परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला असलेली ही जागा पुन्हा काँग्रेसच्या वाट्यालाच आली पाहिजे यासाठी जिल्हा अध्यक्ष या नात्याने तुम्ही प्रयत्न करावे असे मनोगत प्रत्येक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी तरुणांना व उच्चशिक्षित कार्यकर्त्यास संधी देण्यात यावी अशा प्रकारचा सूर एकंदरीत सर्वांच्या मनोगतातून व्यक्त झाला गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघातील कार्यकर्ता पोरका झाला असून वेळप्रसंगी त्यांची पाठ राखण करण्यासाठी स्थानिक नेता नसल्याने दिवसेंदिवस कार्यकर्ते दुरावत चाललेले आहेत या गोष्टीच्या सारासार विचार करता राज्य पातळीवर ही जागा काँग्रेससाठीच खेचून आणावी, असेच मत सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. सध्या तालुका प्रचंड दहशतीखाली वावरत असून कार्यकर्त्यांची होणारी   हेळसांड व ससेहोलपट थांबविण्यात यावी अशा आशयाची मागणी यावेळी करण्यात आली.

या बैठकीस नांदगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे, उदयआप्पा पवार, अशोक बाबा डगळे डॉ.पुंजाराम आहेर कृ उ बा समिती मनमाड संचालक एडवोकेट युनूस शेख ,रामदास पाटील कैलास गायकवाड आयुब शेख बाळासाहेब साळुंखे, भीमराव जेजुरे, मनमाड शहर अध्यक्ष नदीम शेख नांदगाव शहराध्यक्ष मनोज चोपडे, सुनील गवांदे, डॉक्टर सागर भीलोरे दर्शन आहेर उदय पाटील प्रवीण घोटेकर धनंजय काळे विलास सरोवर अरुण निकम रावसाहेब शेलार गोरख बोरसे विजेंद्र पगार रवी पाटील गणेश शेलार आरिफ मंसूरी महेश आहेर सुनील पवार किशोर गडाख निरंजन आहेर, बाळासाहेब सूर्यवंशी, जितेंद्र पगार या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन नाना पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार अमोल आहेर यांनी मानले. या मेळाव्यास नांदगाव तालुक्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments