नांदगांव पोलीस स्टेशन समोर तब्बल एक नव्हे तर पाच गती रोधक बसून ते पुन्हा जेसीबी मशीन लाऊन पुन्हा तोडण्याची नामुष्की सार्वजनिक बांधकांम विभागवर आली आहे. गतीरोधक बसवने पुन्हा तोडणे अशी कुटाण्याची कामे करण्याची व शासकिय मालमत्तेचे नुकसान करण्याची सवय सार्वाजनीक विभागाला लागली कि काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
असेच काहीसे प्रमाण उड्डान पुलाजवळ देखील गतीरोधका लागून मालकी हक्क. दाखवत काही महाशयांनी रस्त्याच्या किनारी दगड टाखून ठेवले आहे. कारण गतीरोधका शिवाय वाहन जाऊ नहे पण या मुळे दगडावर आदळून अपघातात. होऊन कुणाचे प्राण जावेत की काय? याचा विचार आहे की नाही.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगांव पोलीस ठाण्याचे समोर सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच गतीरोधक बसवून आपल्या बुध्दीचे दिवाळे काढले? एकाच ठिकाणी पाच गतीरोधक नियम बाह्या बसवून गत दोन महिण्यात पासून वाहन धारकाना वेठीस धरले होते यामुळे लाहान सहान अपघात झाले याचे काय?आखेर या गतीरोधका बद्दल सोशल मिडीयावर चांगलेच ट्रोल झाल्यावर ते गतीरोधक काढण्याची नामुष्की सांबावर आली. दुसरे असे की शहरातील काॅलेज रोडवर फुटपाथवर माती टाखुन फूटपाथ बंद करण्यात आला आहे. ७५३ जे मार्गावरील देखभाल दुरुस्तीवाले या मार्गावर लाहन सहान कामे करीत असतात यांना हे दिसत नाही का? गत एक महिण्या पासून काँलेज रोडवर हनुमान नगर जवळ फुटपाथवर माती टाकून अतिक्रमण केले आहे. मुळातच अतिक्रमण आणी पुन्हा माती टाकून फुट पाय बंद केले आहे. याकडे साबाने दुर्लक्ष केले. शिवाय उड्डान पुलाजवळ गतीरोधकास लागून मोठ-मोठे दगड टाकून ठेवले आहे, ते काढण्याची गरज आहे. त्यामुळे काही अपघात झाला तर याला कोण जबाबदार असणार आहे या बाबत बांधकाम विभागाने खुलासा करावा अन्याथा संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
0 Comments