नांदगाव परिसरात वादळ वारा व पावसाने पिकांचे नुकसान

 Bay- team aavaj marathi 

 मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

दि १९ रोजी नांदगांव शहर व ग्रामीण भागात वादळवारा आणी पाऊस काही काळ सुरु होता या दरम्यान श्रीराम नगर आणि परिसरातील भागात वादळाच्या तडाख्यात बाजरी व मका पिकाचे मोठे नुकसान झाले.

 वादळामुळे पिके भुईसपाट झाली आहे पुन्हा खरीप पिकांचे नुकसानीचे पंचनामे करणे व शेतकर्याना अनुदान मिळवून देण्याची जबाबदारी शासन व प्रशासनाला घ्यावी लागेल सायंकळी झालेल्या पावसाने बाजरी मका या पिकांना फटका बसला आहे पिके जमिनीला झोपली आहे. 

 दुष्काळ आणी अतिवृष्टीने शेतकरी होरपळला जात असताना दुसरी कडे उशीरा येणारा पाऊस पिकांस जीवदान ठरला तरी तो नुकसानीला कारण ठरत आहे.

Post a Comment

0 Comments