वेळेत प्रथमोपचार मिळाला नसल्याने संतोषचा मृत्यू नातेवाईकांचा आरोप विषारी सापांची संख्या वाढती असल्याने सावधानता अवश्यक - सर्पमित्र सोनवणे

 Bay -team aavaj marathi

 वेळेत प्रथमोपचार मिळाला नसल्याने 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील तरुण शेतकरी संतोष रघुनाथ लाठे (वय ४०) यांस बुधवार दि.१४ रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान शेतात काम करत असताना कोब्रा जातीच्या सर्पाने चावा घेतल्याने मालेगाव येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवार दि. १८ रोजी तीन वाजता निधन झाले. त्यास बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वेळेत प्रथमोपचार मिळाला नसल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप येथील ग्रामपालिका सदस्य बाळासाहेब लाठे यांनी केला आहे.

मयत संतोष लाठे

संतोषचे वडील रघुनाथ लाठे यांचे मागील वर्षी वृध्दपकालाने निधन झाल्या पासून कुटुंबाची जबाबदारी संतोषच्या खांद्यावर आली होती.त्यास सर्प दंश झाल्यानंतर त्वरित उपचारासाठी बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर वेळेत प्रथमोपचार न झाल्याने त्याच्या शरीरात विष पसरल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप येथील ग्रामपालिका सदस्य बाळासाहेब लाठे यांनी केला आहे

योग्य प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी पुढे पाठविले- वैद्यकीय अधिकारी 

दरम्यान दि.१४ रोजी संतोष रघुनाथ लाठे (वय ४०) यांना घेऊन त्यांचे नातेवाईक प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते. संतोष यांचेवर प्रथमोपचार करून अधिक  उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते. असे बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

विषारी सापांची संख्या वाढती असल्याने सावधानता अवश्यक - सर्पमित्र सोनवणे 

घोनस, मन्यार, कोब्रा नाग जातीचे अती विषारी साप आहेत, त्यांची प्रजनन क्षमता एका वेळेस आठ ते पंधरा इतक्या प्रमाणात असते. सर्व प्रकारचे सर्प साधारण पावसाळ्याच्या दिवसात बिळात पाणी जात असल्याने ते दुसर्या ठिकाणी वास्तव्याची जागा शोधण्यासाठी बाहेर पडतात.तरी नागरिकांनी अडगळीच्या ठिकाणी तसेच शेतकरी बांधवांनी शेतात काम करत असताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. गवत वगैरे कापताना आगोदर काठीने घालवून घ्यावे. जेने करून आपणास त्या ठिकाणी साप किंवा काही असल्यास लक्षात येवून आपला जीव वाचु शकतो.असे येथील सर्प मित्र रामेश्वर सोनवणे यांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments