गावचे विकासाचे प्रमुख केंद्र असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि ग्रामपंचायत मळगाव (ता.नांदगाव) येथील दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेवर आ. सुहास अण्णा कांदे यांच्या गटाचे वर्चस्व सिद्ध झाले असून, सरपंचपदी सौ. सुवर्णा आहेर यांची तर विकास सोसायटीचे अध्यक्ष पदी जिभाऊ देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मळगाव येथील मावळत्या सरपंच सुरेखा आहेर यांनी राजीनामा दिल्या नंतर रिक्त झालेल्या पदावर सर्व सहमतीने सरपंचपदी सौ. आहेर यांची निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच नितीन आहेर, श्याम आहेर, बारकू दळवी, आवडाबाई गायकवाड,छाया मोरे, प्रवीण दौलत आहेर आदी ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवला.
याप्रसंगी मळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. अध्यक्षपदी जिभाऊ देवरे, यांची तर उपाध्यक्षपदी सरूबाई आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मावळत्या अध्यक्ष सौ. विद्या आहेर, उपाध्यक्ष विरभान देवरे, तसेच संचालक केशव आहेर, समाधान आहेर, कैलास त्रिभुवन, मुरलीधर आहेर, रघुनाथ देवरे, डॉ. संजय आहेर, अलका आहेर, संदीप आहेर आदीसह ज्ञानदेव आहेर, सर्जेराव आहेर, मुरलीधर आहेर, भाऊसाहेब आहेर, प्रवीण आहेर, कुणाल आहेर, रवींद्र देवरे, प्रकाश आहेर, युवराज आहेर, प्रकाश शिंदे,आदीसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.सदर नवनियुक्त सरपंच, तसेच सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा आ. सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयात युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांनी सत्कार केला.
0 Comments