अंधश्रध्देत पिचलेल्यांना विज्ञान देऊन समाज प्रभोधनाचे कार्य कर्मवीरांनी केले- अमित बोरसे पा.

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

अज्ञानात खितपत पडलेला समाज सुधारण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून कर्मविरानी केले. कर्मकांडाच्या जोखड्यायतुन बाहेर येण्यासाठी महात्मा फुलेच्या विचारांनी प्रेरीत झालेले मविप्र कर्मविरांनी समाज कार्य केले. फुले शाहु आंबेडकर आणी मविप्र संस्थेच्या कर्मविरांनी शिक्षणाचा पाया रचला व सामण्य जनांना विद्यादान घेता आले सत्यशोधक विचार म्हणजे बहुजनांना शिक्षण अंधश्रध्देत पिचलेल्यांना विज्ञान देऊन समाज प्रभोधनाचे कार्य केले.असे मत समाज दिन समारंभ प्रसंगी संचालक अमित बोरसे यांनी केले.

दरम्यान यावेळी मनोगत व्यक्त करताना लेखिका, साहित्यिक, मविप्र संचालक श्रीमती सुरेखा बोर्हाडे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आपल्या पंखात बळ भरावे आणी उंच भरारी घ्यावी समाजिक, शैक्षणीक कार्यात सहभाग घेऊन समाज सुधारणेचे कार्य करावे गरीब असले म्हणून काय झाले विचारांची सकारात्मक भुमीका घेऊन आयुष्य घडवा व मोठे व्हा मोठे मदिंरे बांधून धार्मीक वाद न वाढवाता विध्वान बना पूजनीय व्हा आपण आपल्या समाजासाठी देणे लागतो आहे असे मत लेखिका सुरेखा बोराडे यानी व्यक्त केले. मविप्रचे कर्मवीर राऊसाहेब थोरात यांचा समाजदिन प्रसंगी लेखीका सुरेखा बोर्हाडे बोलत होत्या.


विरांगणा लिलाताई पाटील ह्या थोर सेनानी होत्या त्या साकोरा ता.नांदगांव च्या रहिवास, होत्या त्यांनी सत्यशोधक चळवळीचे प्रेरक वामनराव आप्पा पाटील यांच्या क्रांती पर्व लिलाताई पाटील यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांचा पुतळा उभारून त्यांचे विचार अंमलात आनावे असे मत यांनी व्यक्त केले. स्वातंञ्य सेनानी लिलाताई पाटील यांच्या पुतळा उभारण्याची प्रथम मागणी श्रीमती बोर्हाडे यांनी नांदगांव येथे केली.
सामाजिक सुधारणावादी लिलाताई पाटील यांचे कार्य महान आहे. 

स्वातंञ्य चळवळीत १४ वर्ष कारावास सोसला. यावेळी मविप्र समाज दोनास लेखिका व संचालक सुरेखा बोराडे, संचालक अमित बोरसे, जिप उपमुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पवार,डाॅ.मराठे,माजी आ जगन्नाथ धाञक,अमित बोरसे, प्राचार्य एस एन शिंदे ,पुंजाराम जाधव,रमेश बोरसे, नाना गवांदे,नुतन कासलीवाल,काकळीज सर, बी बी बिन्नर, के के तांदळे, पि डी मढे, छोटु बोरसे,रामनाथन् गायकावाड देवाजीच्या कदम योगेश बोरसे, रमेश कवडे,मवाळ,रवि पाटील जगन्नाथ पाटील, यावेळी संचालक पाटील यांनी व्होरायजन अकँडमीला संस्थेने सव्वापाच कोटी मंजुरी मिळाली आहे. त्याची माहिती दिली. यावेळी विविध क्षेञातील नामवंत उपस्थित होते. मविप्र समाजदिन प्रसंगी ध्वजारोहन करुन कर्मविरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला यावेळी संचालक, व्यवस्थापन समीती,विद्यार्थी पालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments