दि. २... नांदगाव तालुक्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सशस्त्र सीमा सुरक्षा बल (S.S.B) च्या एका तुकडीने ग्रामीण भागातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावांमध्ये स्थानिक पोलीस बांधवांच्या सोबत गावातील प्रमुख मार्गावरून संचलन करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यात शिंदे गटाचे विद्यमान आ सुहास द्वारकानाथ कांदे आणि ठाकरे गटाचे गणेश जगन्नाथ धात्रक, अपक्ष उमेदवार समीर भुजबळ, पंकज रामचंद्र खताळ हे तुल्यबळ उमेदवार उभे ठाकले असल्याने त्याच प्रमाणे नांदगाव तालुक्यात शिंदे गटाचे विद्यमान आ सुहास द्वारकानाथ कांदे आणि ठाकरे गटाचे गणेश जगन्नाथ धात्रक या दोन उमेदवारांचे समांतर नावाचे सुहास बापूराव कांदे व गणेश काशिनाथ धात्रक या नावाच्या दोन उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सध्यातरी नांदगाव कडे वेधून घेतले आहे.
त्यामुळे तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सर्वच ठिकाणी केंद्रीय सशस्त्र सीमा सुरक्षा बल (S.S.B) च्या एका तुकडीने ग्रामीण भागातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावांमध्ये स्थानिक पोलीस बांधवांच्या सोबत गावातील प्रमुख मार्गावरून संचलन करण्यात येत असल्याची माहिती बोलठाण पोलिस बिटचे पोलिस हवालदार भास्कर बस्ते यांनी दिली.
यावेळी गावात पहिल्यांदाच पोलिस बांधवांसमावेत वेगळीच वर्दी घातलेले सशस्त्र सीमा सुरक्षा बल च्या कर्मचाऱ्यांना अचानक फौजफाटा बघितल्याने काही झालं की काय असे विविध तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली होती. परंतु नंतर नागरिकांना समजले की, विधानसभा निवडणुकी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी संचालन करण्यात येत आहे. हे समजल्यानंतर समाधान व्यक्त केले.
0 Comments