राज्यात दिनांक २० नोव्हेंबर रोजी होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात आज दिनांक ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी तीनशे ३७ वैध उमेदवारी अर्ज ठरलेल्या उमेदवारांपैकी १३७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता पंधरा विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांच्या आणि अपक्ष असे दोनशे उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.
यामध्ये जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या मालेगाव बाह्य या दादा भुसे यांच्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघात अद्वय हिरे व भुसे यांचे निकटवर्तीय एकेकाळी सहकारी मानले जाणारे बारा बलुतेदार संघाचे नेते बंडु काका बच्छाव यांच्यासह आणखी १८ असे सर्वाधिक एकूण २१ माघारीनंतर उमेदवार निवडून आखाड्यात आहेत.तर कळवून या अनुसूचित जमाती साठी राखीव असलेल्या विधानसभा मतदार संघासाठी सर्वात कमी सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.तर नांदगाव विधानसभा मतदारसंघातून ३२ पैकी १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे चौदा उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात असून प्रामुख्याने आ. सुहास कांदे, महाविकास आघाडीचे गणेश धात्रक, अपक्ष म्हणून असलेले समीर भुजबळ आणि डॉ. रोहन बोरसे या उमेदवारांमध्ये चुरस होईल अशी एकंदरीत तालुक्यात राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा केली जात आहे.
तर मालेगाव मध्य साठी १६ पैकी तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतला असल्याने तेथे तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बागलाण मतदारसंघात २६ पैकी ९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १७ उमेदवार असतील, तर चांदवड विधानसभेसाठी बाविस पैकी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून १४ तेथे उमेदवार असतील. राज्यातील छगन भुजबळांच्या येवला विधानसभा मतदारसंघात ३० पैकी १७ उमेदवारी अर्ज मागे झाल्याने तेथे १३ उमेदवार निवडणूक लढवत असून तेथे महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे आणि भुजबळ यांच्यात सरळ लढत होणार आहे. तर सिन्नर या मतदारसंघात २२ पैकी दहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तेथे १२ उमेदवार असतील.
निफाड या मतदारसंघात १७ पैकी आठ अर्ज मागे झाल्याने तेथे ९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात एकविस पैकी ८ उमेदवारांची माघार झाल्याने तेथे १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर नाशिक मध्य मतदारसंघात २१ पैकी अकरा उमेदवारी अर्ज मागे झाल्याने तेथे १० उमेदवार, नाशिक पुर्व पंधरा पैकी दोन अर्ज मागे झाल्याने तेथे तेरा आणि नाशिक पश्चिम बाविस पैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तेथे १५ तर देवळाली येथील मतदार संघात १८ पैकी सहा उमेदवारी अर्ज मागे झाल्याने तेथे १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. व इगतपुरी विधानसभा मतदार संघासाठी २८ वैध उमेदवारी अर्जांपैकी अकरा उमेदवारांनी आपले विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेतल्यामुळे तेथे १७ उमेदवार विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याने जिल्ह्यात १५ विधानसभा मतदारसंघासाठी दोनशे उमेदवार निवडणूकीच्या आखाड्यात आहेत.
0 Comments