नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक मनमाड येथे संपन्न होऊन संपूर्ण तालुक्याची कार्यकारणी याप्रसंगी निवडण्यात आली होती येणाऱ्या काळात डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आणि मूलभूत असणाऱ्या गरजा यावर आवाज उठवण्यासाठी तालुक्यातील सर्व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी एकत्र येऊन कार्यकारणी तयार करण्यात आली.
या संघटनेच्या अध्यक्षपदी नाना अहिरे कार्याध्यक्ष अविनाश मगर, उपाध्यक्ष प्रज्ञानंद (बापू) जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे सचिव अफरोज अत्तार, सहसचिव माधुरी पगारे, खजिनदार किरण भालेकर, सह खजिनदार श्वेता बागुल, संघटक राजेंद्र जाधव, संपर्कप्रमुख अनिस शेख, प्रसिद्धी प्रमुख विजय बडोदे ,स्वप्निल धनवटे तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून विशाल हिरे व क्रांती आव्हाड यांची निवड करण्यात आली एकंदरच आगामी काळात नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने सर्व सदस्यांनी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. या वेळी संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments