नांदगांव ४० गांव रोडवर. पिंपरखेड जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी होऊन एकाचा मृत्यू

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

 नांदगांव ४० गांव रस्त्यावर दि ९ रोजी एका इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मयत झाला आहे, या इसमाचे अंदाजे (वय ४५) असून त्याची ओळख पटलेली नाही. त्यांच्या कमरेला डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन रक्त स्राव होवून मयत झाला आहे.

 अपघात ग्रस्त अज्ञात वाहनधारकाने अपघाताची जवळच्या पोलिस ठाण्यात कोणतीही खबर न देता तेथून फरार झाला आहे या घटनेची नांदगांव पोलिसात अज्ञात वाहनावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत इसमाचे अंदाजे वय ४५ असून उंची पाच फुट पाच इंच, शरीर बांधा सडपातळ,रंग सावळा, केस काळे पांढरे आहेत तर त्याने अंगावर उभे लाईन चा पांढरा अंगरखा, काळी इजार, गळ्यात भगवा दोरा, या वर्णनाचा आहे. सदर वर्णन असलेल्या इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास नांदगाव पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे तपासणी अधिकारी साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मोरे यांनी कळविले आहे.



Post a Comment

0 Comments