अपूर्ण कर्मचारी वर्ग असतांनाही उत्कृष्ट सेवा देणारे बोलठाणचे प्रा आ.केंद्र

 Bay -team aavaj marathi 

नाशिक जिल्ह्यातील शेवटचे आणि व्यापार पेठ म्हणून नाव लौकीक असलेल्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने अत्यंत कमी मनुष्यबळ असतांनाही उत्तम व्यवस्थापन करुन परिसरातील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्याचे काम तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती गोंड आणि कर्मचारी करत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र बोलठाण 

सध्या येथे २२ कर्मचारी आवश्यक असून १२ कर्मचारी संख्या रिक्त असून दहा कार्यरत कर्मचारी दररोज सुमारे ५० ते ६० महिला व नागरिक आरोग्य सुविधा देत आहेत. येथे मागिल वर्षांपर्यंत महिन्यात दोन वेळा कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात यायचे परंतु काही महिन्यांपासून तज्ञ डॉक्टर अभावी हे शिबिर बंद करण्यात आले आहे.

डॉ. संतोष जगताप तालुका वैद्यकीय अधिकारी नांदगाव 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील शेवटचे गाव असलेल्या बोलठाण येथे लोकनेते तत्कालीन आ.कै. कन्हैयालाल नहार यांनी दुरदृष्टी ठेवून परिसरातील नागरिकांना उत्कृष्ट सेवा उपलब्ध व्हावी यासाठी स्वतः मालकीची गावालगत असलेल्या शेतजमिनीतून साधारण चाळीस गुंठे जागा दान स्वरूपात दिली. सुरुवातीला या दवाखान्याचे दगडी बांधकाम करुन कौलारू इमारत तयार करण्यात आली. त्यानंतर सन १९९४ मध्ये इमारत लहान होत असल्याने पुन्हा नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. व तत्कालीन आरोग्य मंत्री श्रीमती पुष्पाताई हिरे यांच्या हस्ते या प्रा. आ. केंद्राचे लोकार्पण सोहळा करण्यात आले.

महिला व नागरिकांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून या आरोग्य केंद्राअंतर्गत खुद्द बोलठाण जातेगाव आणि कासारी या तीन ठिकाणी आरोग्य उपकेंद्र तेव्हापासून नांदगाव तालुक्यातील साधारण पंचवीस किलोमीटर आणि शेजारील वैजापूर व कन्नड तालुक्यातील पंधरा किलोमीटर अंतरातिल नागरिक आज तागायत निरंतर आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा विचार केला असता, त्यावेळच्या आणि आताच्या दुपटीने वाढ झाली आहे येथे कर्मचारी संखेत देखील वाढ होणं गरजेचे होते. परंतु काळाच्या ओघात मात्र तसे झाले नाही. 

 सध्या येथे आरोग्य सहाय्यक दोन जागे पैकी १ रिक्त असून चांदवड तालुक्यातील एक कर्मचारी डेपो टेशन वर आहे. व औषध निर्माण अधिकारी एक कर्मचारी आवश्यक असून ती जागा रिक्त आहे, परिचर ४ पैकी रिक्त ३, लॅब टेक्निशियन १ जागा रिक्त आहे, आरोग्य सेविका १ रिक्त आहे, स्टाफ नर्स ५ पैकी २ रिक्त एक डेपोटेशनवर न्यायडोंगरी येथे असून सध्या येथे दोन नर्स कार्यरत आहेत. तसेच येथील कनिष्ठ सहाय्यक जागा रिक्त असून नांदगाव मुख्यालयाच्या कर्मचार्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. आणि कायमस्वरूपी एक वाहन चालक आवश्यक असून ती जागा रिक्त आहे असे एकूण २२ पैकी १२ कर्मचारी संख्या रिक्त आहेत. त्याचप्रमाणे या आरोग्य केंद्रास बघळ जागा उपलब्ध आहे परंतु संरक्षण भिंत आणि मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नाही. तरी आरोग्य विभागाने रिक्त असलेली पदांची भरती करावी अशी मागणी होत आहे.


Post a Comment

0 Comments