आदर्श आचारसंहिता भंग केल्याने चार उमेदवारांवर गुन्हा दाखल तर दोघांकडून रोख रक्कम जप्त .

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव शहरालगत असलेल्या गिरणानगर ग्रामपंचायत हद्दीत होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या चार उमेदवारांनी विना परवानगी निवडणूक प्रचाराचे फलक आणि झेंडे लावल्या बद्दल चार उमेदवारांवर येथील ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती आहेर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आदर्श आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव शहरालगत चाळीसगाव रस्त्याच्या कडेला हनुमान मंदीरापासून काही अंतरावर गिरणानगर ग्रामपंचायत हद्दीत होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करत असलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विद्यमान आ. सुहास कांदे, महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक, अपक्ष उमेदवार माजी खा.समीर भुजबळ आणि डॉ. रोहन बोरसे यांनी विना परवानगी गिरणानगर ग्रामपंचायत मालकीच्या जागेत निवडणूक प्रचाराचे फलक आणि झेंडे लावल्या बद्दल येथील ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती हिमगौरी पंडितराव आहेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदगाव पोलिस ठाण्यात आदर्श आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ५१३/२०२४ नुसार दि १४ नोव्हेंबर रोजी १९९५ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या प्रकारनात त्याच दिवशी १४ नोव्हेंबर रोजी चार वाजता MH 20 CT/4516 या नंबर च्या पिकप गाडीमध्ये दोन लाख ७८ हजार ५०० रुपये रोख स्वरूपात गाडी चालक शेख फिरोज शेख हूसेन हे घेऊन जाताना आणि तालुक्यातील न्यायडोंगरी येथे लावण्यात आलेल्या क्रमांक ६ च्या स्थिर नाका बंदी पथकाने दि. १५ रोजी सायंकाळी स्विफ्ट डिझायर कार MH 15- DS/ 6196 या गाडीची झडती घेतली असता त्यात चालक शंकर नाना गवळी हे दोन लाख पंचावन्न हजार रुपये रोख आढळून आले असल्याने, दोन्ही मिळून पाच लाख ३३ हजार पाचशे रुपये येथील उपकोषागार कार्यालय नांदगाव येथे जमा करण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील सौंदाने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा तक्रार निवारण समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना कळविले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments