नांदगाव तालुक्यात भयमुक्तीची टॅग लाइन फेल आ. कांदे ठरले पुन्हा 'जायंट किलर'

 Bay team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यात आ.सुहास कांदे यांनी मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय प्राप्त करून देत अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना धोबीपछाड देत 'जायंट किलर' ठरले आहेत. गेल्या पाच वर्षांत नांदगाव मतदारसंघात केलेली विकासकामे जनतेसमोर ठेवत, समीर भुजबळांनी टाकलेल्या 'भयमुक्त' च्या राजकीय डावपेचांना तोड देत व सामाजिक समीकरणाचा मेळ साधत आ. कांदे यांनी सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयश्री खेचून आणला.सुरुवाती पासूनच एकतर्फे आमदार सुहास अण्णा कांदे यांची मतमोजणी दरम्यान आघाडी दिसून येत होते त्यामुळे अगोदरच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला होता. निवडणुकीचा निकाल घोषित होताच भव्य मिरवणूक काढण्यात आली.

कमी कालावधीत समीर भुजबळांची भयमुक्त टॅग लाइन खाली रन' केलेली निवडणूक सपशेल फेल ठरली.कांदे यांच्या विरुद्ध समीर भुजबळ, ठाकरे गटाचे गणेश धात्रक व अपक्ष डॉ. रोहन बोरसे हे उमेदवार होते. या निवडणुकीत जातीय सामाजिक समीकरणे प्रभावी ठरतील, असे चित्र दिसत असताना आ. कांदे यांचे तळागाळातील गावातील कार्यकर्ते आणि पत्नी सौ अंजुम ताई कांदे यांनी मतदार संघात महिला भगिनीं सोबत प्रस्थापित केलेले संबंध मागील पाच वर्षात त्यातल्यात्यात गत शिंदे सरकार स्थापन झाल्या नंतर तालुक्यात कमी कालावधीत राबवलेल्या विविध विकासकामांच्या योजना या जोरावर आ. सुहास अण्णा कांदे यांनी हे सर्व मुद्दे खोडून काढत एकतर्फे विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तालुक्यात विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजल्या पासून तालुक्यात 'हाय व्होल्टेज ड्रामा' सुरू होता. 

तालुक्यातील तीन माजी आमदार शिवसेना कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गट वगळता भाजप आणि इतर मित्र पक्षांना सोबत घेवून आ. कांदे यांच्यासह पत्नी अंजुम कांदे व कुटुंबीयांनी सुयोग्य असे नियोजन केले. ही निवडणूक उभी करताना अगदी छोट्यातल्या छोट्या घटकाला सोबत घेण्याची किमया साधली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली प्रचाराच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केलेल्या आवाहनाचा प्रभाव, लाडकी बहीण योजना, मतदारसंघातील सोपविलेले प्रलंबित प्रश्न आ. सुहास कांदे यांच्या विजयाचे गणित सोपे झाले.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत असताना आमदार सुहास अन्य कांदे यांनी सांगितले की माझ्या मतदारसंघात सिंचन आणि इतर विकास कामांसाठी अपेक्षित निधी मुख्यमंत्री साहेबांकडून मिळत असेल तर मी मला मंत्री पद मिळत असेल तरी त्यावर पाणी सोडेल असे ते म्हणाले.





Post a Comment

0 Comments