विद्यार्थ्यांनी लेखन वृत्ती जोपासावी असावी- अमित बोरसे

 Bay team aavaj marathi 

नांदगाव येथील म.वि.प्र. समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक नियतकालिक 'वाटचाल' प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला. महाविद्यालयातील विद्यार्थी हा उद्याचा भविष्यातील भारताचा जबाबदार नागरिक आहे. त्याने अवतीभोवती घडणाऱ्या घटनांकडे डोळस वृत्तीने बघून त्याला लिखित रूपात मांडण्याचा प्रयत्न करावा. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक, घडामोडी मांडण्यासाठी महाविद्यालयातील नियतकालिक हे एक महत्त्वाचे साधन आहे यामधून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना लिखित स्वरूपात व्यक्त कराव्यात, लिखाण वृत्तीतून आपण आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपत असतो. अशा भावना कार्यक्रमाचे अध्यक्ष म.वि.प्र. संचालक श्री अमित बोरसे यांनी व्यक्त केल्या. 

याप्रसंगी महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री संजीव निकम यांनी विद्यार्थ्यांनी लिखाणाचे महत्त्व समजून घ्यावे लिखाणातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो असे मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले . याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शरद पाटील, समिती सदस्य श्री विश्वासराव कवडे, अरविंद पाटील, वाल्मीक शेवाळे, सचिन बैरागी, विजय काकळीज प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे उपप्राचार्य डॉ. संजय मराठे व्यासपीठावर उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेचे  सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक प्रा. योगेश वाघ यांनी केले सूत्रसंचालन प्रा.बी. के. पवार व आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र हिरे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments