तांदुळवाडी येथे एम.डी.काळे इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल, मध्ये संविधान दिन साजरा..

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

श्री सिद्धबाबा धर्मनाथजी महाराज सेवाभावी संस्था संचलित एम.डी.काळे इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, तांदुळवाडी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.या वेळी शाळेचे अध्यक्ष दिनेश काळे तसेच मुख्याध्यापक नेहा काळे उप मुख्याध्यापक साक्षी अहिरे याच्या हस्ते भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, याप्रसंगी संविधान प्रतीचे वाचन करण्यात आले.

 यावेळी सर्व शिक्षक व मुलांकडून संविधान प्रतिज्ञा घेतली तसेच भारतीय संविधानाचे काय महत्व विशद करताना म्हणाले की, २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चा सत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो असे उपस्थितांना सांगितले.

 यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधान दिनावर थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले होते यावेळी या संविधान दिनाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर सुरसे यांनी केले तर मनीषा डोखे यांनी संविधानाबद्दल माहिती सांगितली शाळेत संविधान दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका वंदना इंगोले, रोशनी ठेंगे, प्रभाकर आहेर, दीपिका बोरसे,अर्चना इंगोले, प्राजक्ता काकळीज, भाग्यश्री सूर्यवंशी, कविता आयनोर,अमृता जाधव,ऋतुजा शेवाळे संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सर्वांनी परिश्रम घेतले. यावेळी 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी आधिकारी या सर्वांना संस्थेच्या वतीने व उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती.


Post a Comment

0 Comments